Manasvi Choudhary
बटाटे हे रोजच्या जेवणातील महत्वाचा पदार्थ आहे. प्रत्येकाच्या घरात बटाटापासून विविध पदार्थ बनवले जातात.
बटाटा भाजी, बटाटा पराठा, बटाटा खिचडी असे विविध पदार्थ बटाट्यापासून बनवले जातात. मात्र बाजारातील बटाटे खरेदी करण्यापूर्वी त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.
बाजारातील बटाट्यांमधील भेसळ सांगते की तुम्ही बनावट बटाटे खरेदी करत आहात, यामुळे बटाटे खरेदीकरण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासणे महत्वाचे आहे.
बटाटा खरेदी करताना हाताने दाबून पाहा. जर तो मऊ वाटत असेल, तर तो जुना किंवा आतून खराब असू शकतो. नेहमी कडक बटाटे निवडा.
ज्या बटाट्यांवर हिरवे डाग आहेत किंवा मोड आले आहेत, ते खरेदी करू नका.
बटाट्याची साल स्वच्छ आणि घट्ट असावी. जर साल हाताने घासल्यास सहज निघत असेल किंवा त्यावर डाग असतील तर ते बटाटे लवकर खराब होतात.
ताजे आणि नैसर्गिकरत्या बटाटे हे मातीचा सुवास देतात. जर बटाट्यांना उग्र किंवा रासायनिक वास येत असेल, तर त्यावर प्रक्रिया केलेली असू शकते.