pune news  Saam tv
मुंबई/पुणे

भाजप कार्यालयाबाहेर तगडा बंदोबस्त; उमेदवारी न मिळाल्याने निष्ठावंत नाराज, RPI कार्यकर्तेही भडकले

pune political news : भाजप कार्यालयाबाहेर तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. उमेदवारी न मिळाल्याने निष्ठावंत नाराज आहेत. दुसरीकडे RPI कार्यकर्तेही भडकले आहेत.

Vishal Gangurde

पुण्यात राजकीय घडामोडींना वेग

उमेदवारी न मिळाल्याने निष्ठावंत नाराज

आरपीआय कार्यकर्त्यांचंही आंदोलन

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुण्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुण्यात भाजपने उमेदवारांची अधिकृत जाहीर केलेली नाही. दुसरीकडे भाजपसमोर बंडखोरी रोखणेच मोठं आव्हान आहे. मात्र, काही प्रभागातून बंडखोरीलाही सुरुवात झाली आहे. अनेक निष्ठावंतांना उमेदवारी न मिळाल्याने निष्ठावंत नाराज असल्याचे समजतंय. तर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते भाजप कार्यालयाबाहेर आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पुण्यात निष्ठावंत भाजप कार्यकर्ते नाराज झाले आहेत. उमेदवारीवरून कार्यकर्त्यांची नाराजी पाहायला मिळत आहे. आमदार हेमंत रासने यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलेले असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी फेसबुक पोस्टमधून नाराजी व्यक्त केली. या तिकीट वाटपावरून रिपब्लिकन पार्टीमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे. रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी भाजप शहर कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये नाराजी का पसरली?

पुण्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या पक्षाची भाजपशी युती आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या बाबतीत शहर स्तरावर जागावाटप बाबत चर्चा सुरू होती. पदाधिकार्‍यांनी पक्षाच्या नियमांचे पालन करून मुलाखती दिल्या. वीस ते चाळीस वर्षांपासून पक्षांसाठी काम करणारे कार्यकर्ते संधी मिळेल, या आशेवर होते. परंतु भाजपने सहा जागा नव्हे तर उमेदवारांच्या नावासहित जागा सोडल्या. जे मूळ रिपब्लिकन पक्षाचे लोक नाहीत. त्यामुळे पक्षातील इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यासाठी उमदेवारी आणि त्यांचे पाठीराखे कार्यकर्ते यांच्यामध्ये अफवा पसरू लागल्या आहेत.

पुण्यात भाजपमध्ये मोठी बंडखोरी होणार?

पुणे शहरात भाजपातून मोठी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. नगरसेवक राहिलेल्या अनेक जणांचे तिकिटं विविध कारणांमुळे कापले जाणार आहे. तर पुणे शहरातील भाजपच्या १० ते १२ नगरसेवकांना उमेदवारीसाठी फोन आलेला नाही. पुण्यातील १० ते १२ नगरसेवकांच्या बाबत भाजपकडून निर्णय नाही. कोथरूड, बाणेर, मध्यवर्ती पेठांमधील अनेक नगरसेवकांचे तिकीट कापले जाणार आहे. भाजपमध्ये होणाऱ्या बंडखोरीवर महाविकास आघाडीचे लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील अनेक शाळांना आज सुट्टी

Mumbai Mayor : मुंबईचा महापौर दिल्लीत ठरणार, शेलार-साटम अन् शेवाळे राजधानीत, शिंदेंच्या मनात नेमकं काय?

SIP Calculator: दररोज फक्त १०० रुपये गुंतवा अन् ४ कोटी मिळवा; SIPचं कॅल्क्युलेशन वाचा

First step if phone hacked: तुमचा फोन हॅक झाला तर पहिली गोष्ट कोणती करावी? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर! मंत्री आदिती तटकरेंनी केली मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT