पूरग्रस्तांसाठी पुणे मनपाचा मदतीचा हात ! गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

पूरग्रस्तांसाठी पुणे मनपाचा मदतीचा हात !

पुणे महापालिकेतील भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन पूरग्रस्त भागासाठी देण्याचा निर्णय घेतला, असल्याची माहिती पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

गोपाल मोटघरे

गेल्या संपूर्ण आठवड्याभराच्या कालावधीत पावसाने संपूर्ण राज्यभरात हाहा:कार माजवला होता. अतिवृष्टीचा व पुराचा सर्वाधिक फटका कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांना बसला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांना देखील मोठ्या प्रमाणावर नुकसानास सामोरे जावे लागले आहे.

हे देखील पहा -

याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेतर्फे मदतीचा हात या पूरग्रस्त भागांसाठी पुढे करण्यात आला आहे. ज्या भागांमध्ये सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, तेथील नागरिकांना आर्थिक मदतीसाठी पुण्यातील भाजपा नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. पुणे महापालिकेतील भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन पूरग्रस्त भागासाठी देण्याचा निर्णय घेतला, असल्याची माहिती पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पूर परिस्थिती थोड्याफार प्रमाणावर आटोक्यात येत असताना आणि विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत असताना, स्थानिकांचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पुणे महानगरपालिकेतर्फे रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या वैद्यकीय सेवेसाठी डॉक्टर व आरोग्यकर्मींची टीम आज रायगडसाठी रवाना झाल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.

तसेच महापालिकेच्यावतीने पाण्याचे टँकर, जलशुद्धीकरणाची यंत्रसामुग्री, कोल्हापूरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्यासाठी पाण्याचे १७ टँकर पाठवण्यात आले आहेत. राज्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी आवश्यक ती मदत तत्परतेने करण्यात येईल असेही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT