Sonali Andekar victory, Pune Ward 23 result Saam
मुंबई/पुणे

Pune Results : आंदेकरांचा तुरूंगातूनही दबदबा, धंगेकरांच्या पत्नीचा दारूण पराभव, प्रभाग २३ मध्ये नेमकं काय झालं?

Sonali Andekar victory, Pune Ward 23 result : पुणे महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक २३ मध्ये हायप्रोफाईल लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली आंदेकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या प्रतिभा धंगेकर यांचा पराभव केला आहे.

Akshay Badve

Pune Municipal Corporation Election  Sonali Andekar Result Marathi News : पुणे महापालिका निवडणुकीत वनराज आंदेकरांच्या पत्नीने विजय मिळवलाय. प्रभाग क्रमांक २३ कडे पुणेकरांचे लक्ष लागले होते. तुरूंगातून निवडणूक लढवणाऱ्या सोनाली आंदेकर यांनी रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीचा पराभव केला. सोनाली यांचा प्रचार करताना नेकी का काम, आंदेकर का नाम, या स्लोगनचा वापर केला होता. याला यश आल्याचे दिसतेय.

काय म्हणता पुणेकर! हरले ना राव धंगेकर, असे काही मेसेज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर या आयुष कोमकर यांच्या हत्या प्रकरणात तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. महापालिका निवडणुकीत त्यांनी तुरूंगातूनच सहभाग नोंदवला होता. त्यांनी रवींद्र धगेंकर यांच्या पत्नीचा पराभव केला. न्यायालयाने जामीन नाकारून सुद्धा सोनाली आंदेकर प्रभाग २३ मधून विजयी झाल्या आहेत. सोनाली आंदेकर या राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची पत्नी आहेत. तर गुंड बंडू आंदेकरची सून आहे.

पुण्यातील नाना पेठ आणि रविवार पेठ या परिसरातील प्रभाग क्रमांक २३ ब मध्ये धंगेकर आणि आंदेकर यांच्यात लढत रंगतदार झाली. शिवसेना शिंदे पक्षाच्या प्रतिभा धंगेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली आंदेकर यांच्यात सामना रंगला. या हायप्रोफाईल लढतीकडे पुणेकरांचे लक्ष लागले होते.

अखेरच्या फेरीत प्रभाग 23 मधून रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर पिछाडीवर होत्या. तर सोनाली आंदेकर 1950 मतांनी आघाडीवर होत्या. पण अखेरीस सोनाली आंदेकरने दणक्यात विजय मिळवला. सोनाली आंदेकरला 10809 मतं मिळाली तर प्रतिभा धंगेकरला 8859 मतं मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणात MIM ची दमदार एन्ट्री; १२० हून अधिक उमेदवार जिंकल्याचा दावा, काँग्रेसलाही पडले भारी

Celebrity Divorce: प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोडला संसार; 23 महिन्यांनी घेतला काडीमोड

Maharashtra Elections Result Live Update: रवींद्र धंगेकर यांच्या मुलाचा पराभव

ऐनवेळी प्रभाग बदलला आणि अखेरच्या क्षणी ठाकरेंच्या माजी महापौराचा दणदणीत विजय|VIDEO

Stomach cancer: पोटाचा कॅन्सर झाल्यावर शरीरात कोणते बदल दिसून येतात?

SCROLL FOR NEXT