मुंढवा जमीन प्रकरणात तहसीलदाराचा मोठा खुलासा
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाखाली पत्र पाठविल्याची कबुली
१८०० कोटींच्या सरकारी जमिनीच्या वादात राजकीय हस्तक्षेपाची चर्चा
सागर आव्हाड, पुणे
राज्यात गेले काही दिवस मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण जोरदार चर्चेत आहे. याप्रकरणी आता निलंबित तहसीलदार सुर्यकांत येवलेने मोठा खुलासा केला आहे. तहसीलदारावर बाॅटेनिकल गार्डनला पत्र पाठविण्यासाठी वरिष्ठांचा दबाव असल्याचं या त्याने ८ तासांच्या चौकशीदरम्यान पोलिसांकडे कबूल केलं आहे.
मुंढवा येथील सर्व्हे क्रमांक ८८ याठिकाणी ४० एकर शासकीय जमीन सरकारने बाॅटेनिकल गार्डन यांना ५० वर्षाच्या करारावर दिलेले असून त्याची मुदत सन २०३८ पर्यंत आहे. मात्र, बाजारमूल्य १८०० काेटीची असलेली ही जागा मुळ महार वतनदार यांचे मालकीचे असून, त्यांचे पत्र आपल्याकडे असल्याचे सांगत शीतल तेजवानी हिने परस्पर या जागेची खरेदी भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्रायजेस या कंपनीशी ३०० काेटी रुपयात केला.
सदर जागा बाॅटेनिकल गार्डन यांनी खाली करावी यासाठी अमेडिया कंपनीने आपल्याशी पत्रव्यवहार केला असून, त्याचे पालन आपण करावे असे लेखी पत्र बाॅटेनिकल गार्डन यांना येवले यांनी पाठवलेले हाेते. त्यानुसार सुर्यकांत येवले यांच्यावर देखील गुन्हा दाखल असून त्यांची पुणे पाेलीसांचे आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल आठ ते दहा तास चाैकशी केली आहे. यामध्ये तहसीलदार यांनी आपल्यावर प्रशासनाताील वरिष्ठ अधिकारी यांचा दबाव असल्याने आपण हा पत्रव्यवहार केला असल्याची धक्कादायक बाब पाेलीसांना दिली आहे.
त्यामुळे याप्रकरणात नेमके केस दाखल करण्यासाठी काेणाचा दबाव हाेता हे समाेर येणे महत्वपूर्ण अाहे. तसेच सदर वरिष्ठ अधिकारी हा प्रशासनात प्रमुख पदावर कार्यरत असून त्याच्यावर सत्ताधारी एका वजनदार राजकीय नेत्याने दबाव टाकल्याची चर्चा पाेलीस खात्यात अंर्तगत रंगली आहे. कारण, निलंबित तहसीलदार याला सदर पत्र व्यवहार करण्यासाठी सदर अधिकारी याने वारंवार फाेन केले असल्याचे देखील चाैकशीत निष्पन्न झाले आहे. त्यानुसार तहसीलदार यांनी २६/५/२०२५ राेजी बाॅटेनिकल गार्डन यांना जागा खाली करण्यासाठी पत्र पाठविल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.