pune muncipal corportation (pmc)
pune muncipal corportation (pmc) saam tv
मुंबई/पुणे

PMC: पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा १ फेब्रुवारीस जाहीर होणार

साम न्यूज नेटवर्क

- ब्रिजमोहन पाटील

पुणे : पुणे महापालिकेच्या (pune muncipal corportation) निवडणुकीसाठी (pune muncipal corportation election) प्रारूप प्रभाग रचना १ फेब्रुवारी रोजी जाहीर केली जाणार असून १ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत त्यावर हरकती सूचना मागविण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना यासंदर्भात पत्र पाठविले असून, महापालिकेने सादर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता दिल्याचे स्पष्ट केले आहे.

महापालिकेने (pune muncipal corportaion) २० जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने (election commission) सुचविलेल्या २४ बदलांसह तयार केलेला सुधारित आराखडा आयोगाला सादर केला. त्यानंतर आठवड्याभरात आयोगाकडून प्रारूप आराखडा जाहीर करणे, हरकती सूचना मागवून त्यावर सुनावणी घेणे याचा कार्यक्रम जाहीर करेल असा अंदाज वर्तविला होता. आयोगाने दोन दिवसांपूर्वी काढलेल्या आदेशात आधी प्रभाग रचना निश्‍चीत होईल व सर्वात शेवटी आरक्षणांसाठी सोडत काढली जाईल असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर २८ जानेवारीलाच पुणे महापालिकेला प्रभाग रचना मंजूर झाल्याचे पत्र पाठविण्यात आले होते. पिंपरी चिंचवड व इतर महापालिकांना पत्र मिळाल्याने पुणे महापालिकेच्या अधिकार्यांना चौकशी करणारे अनेक फोन गेले, परंतु पुणे महापालिकेला (pmc) प्रारूप आराखडा मंजूर झाल्याचे पत्र मिळाले नसल्याचे सांगण्यात आले होते.

दरम्यान, पुणे (pune) महापालिकेला प्रारूप प्रभाग रचना मंजूर केल्याचे पत्र मिळाले असून, यामध्ये १ फेब्रुवारीला सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना जाहीर करावी, १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान हरकती सूचना मागविण्यात याव्यात, १६ फेब्रुवारी रोजी प्राप्त झालेल्या हरकती सूचनांचे विवरण पत्र सादर करावे, २६ फेब्रुवारी पर्यंत हरकती सूचनांवर सुनावणी घ्यावी, सुनावणी नंतर २ मार्च पर्यंत प्राधिकृत अधिकार्यांने केलेल्या शिफारशीनुसार निवडणूक आयोगाला पाठवावे, असे आदेशात नमूद केले आहे.

सरासरी प्रभाग ६१ हजाराचा

निवडणूकीत ३ सदस्यांचे ५७ तर २ सदस्यांचा एक असे ५८ प्रभाग असणार आहेत. प्रभाग क्रमांक १३ हा दोन सदस्यांचा असणार आहे. तीन सदस्यांच्या प्रभागाची सरासरी लोकसंख्या ६१ हजार ६७९ असणार आहे. तर सर्वात मोठा प्रभाव ६७ हजार ८४७ लोकसंख्येचा तर सर्वात लहान ५५ हजार ५११ लोकसंख्येचा असणार आहे. एकूण १७३ जणांपैकी १४८ जागा खुल्या गटासाठी असतील. तर २३ अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमातीसी आरक्षित असतील. १७३ पैकी ८७ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत, त्यामध्ये १२ अनुसूचित जाती, १ अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित आहेत. ७४ जागा खुल्या गटातील महिलांसाठी असणार आहेत. मात्र प्रभाग रचना अंतिम झाल्यावर आरक्षणासाठी सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण असणार हे गुलदस्त्यात असेल.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Criminal Justice 4 Announcement : पंकज त्रिपाठी हाती आला नवा खटला; क्रिमिनल जस्टीसच्या चौथ्या भागात कोणाला देणार न्याय

Viral Video: भयानक! भररस्त्यात धावत्या दुचाकीने अचानक घेतला पेट; पुढे जे घडलं ते... थरारक VIDEO समोर

Avinash bhosale : उद्योजक अविनाश भोसले यांना मोठा दिलासा; मुंबई हायकोर्टाकडून जामीन

EPF Balance: एक मिस्ड कॉल द्या अन् ईपीएफ बॅलेंस चेक करा; वाचा सविस्तर

Latur Water Crisis | टँकर आला की हंडा घेऊन पळतात, लातूर जिल्ह्यात भीषण परिस्थिती!

SCROLL FOR NEXT