पुणे: आगामी महापालिका (Muncipal Corporation Election) निवडणुका डोळ्यासमोर ठेवत पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीत (BJP-NCP) सध्या पोलखोल स्पर्धा रंगली आहे.एकीकडे राष्ट्रवादी सत्ताधारी भाजपच्या कामांची पोलखोल करत आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचे शहरात एक काम दाखवा आणि बक्षिस देण्याची घोषणा भाजपने केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विकास कामांवरून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे शहरातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपसह राष्ट्रवादी आणि सर्वच पक्षांनी सध्या कंबर कसली आहे. याच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी भाजपची पोलखोल करण्यासाठी अनोखी स्पर्धा घेतली आहे. यामध्ये पुण्यातील नागरिकांनी व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणार्या विजेत्या स्पर्धकास बक्षीसं देखील दिली जाणार आहेत.
राष्ट्रवादीच्या या अनोख्या स्पर्धेवर गप्प राहील ती भाजप कसली?... मग भाजपनेही याच पार्श्वभूमीवर पुण्यातील महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिलं आहे. राज्यात गेल्या दीड वर्षात सत्तेत असलेल्या महाआघाडी सरकारने पुणे शहरासाठी केलेले एक भरीव 'विकासकाम दाखवा' ही स्पर्धा आयोजित केली आहे. विजेत्याला ३० हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केलं आहे. शिवाय राष्ट्रवादीच्या काळात विकासकामे कशी होऊ नयेत, याचा वस्तुपाठच राष्ट्रवादीनं घालून दिलाय, असा टोला भाजपने लागवला आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर आली आहे. त्यामुळे कुठलाही मुद्दा आला आणि भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने आले नाही, तरच नवल... आता तर एकमेकांच्या कामाची पोलखोल करण्याची स्पर्धाच लागल्यानं हा वाद लगेच संपेल असं नाही... मात्र या सगळ्यात एक गोष्ट खरीय... या आरोप-प्रत्यारोपांनी मधून पुणेकरांचे मनोरंजन होईल, हे मात्र तितकच खरं !!!
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.