Pubs and Bar Entry rules : yandex
मुंबई/पुणे

Pubs and Bar Entry rules : मुंबई, पुण्यात बार-पब प्रवेशासाठी वयाचा पुरावा लागणार, काय आहे शासनाचा नवा नियम?

Vishal Gangurde

अक्षय बवडे, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुणे पोर्शे अपघातानंतर शासनाने कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुणे कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने पोर्शे कार चालवत दोघांना चिरडलं होतं. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलत बचाव करण्याचाही प्रयत्न झाला. या सर्व प्रकरणानंतर शासनाने पार-पब प्रवेशासाठीचे वयाबाबतचे नियम कठोर केले आहेत.

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर बार-पबमध्ये प्रवेश करण्याआधी वयाचा पुरावा दाखवणे बंधनकारक असणार आहे. यामुळे संबंधित व्यक्तीला सरकारी ओळखपत्र दाखवावं लागणार आहे. बार-पबमध्ये अल्पवयीन मुलांना प्रवेश मिळून नये, यासाठी आता प्रवेशद्वारावर ओळखपत्र तपासलं जाणार आहे.

वाईन-बिअर पिण्यासाठी २१ वर्ष वय तर दारु पिण्यासाठी २५ वर्ष वय असणे बंधनकारक असणार आहे. या निर्णयानंतर बार-पब मालकांनी ओळखपत्र दाखवल्याशिवाय दारु न देण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्यास मुंबई-पुण्यात सुरुवात झाली आहे.

शिवानी आणि विशाल अग्रवालची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

शिवानी, विशाल अग्रवाल आणि अश्फाक मकानदार यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. शिवाजीनगर कोर्टाने याबाबत हा निर्णय दिला आहे. या तिघांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ससून ब्लड रिपोर्ट प्रकरणी तिघांची मागील शुक्रवारी पोलीस कोठडी संपली. त्यानंतर तिघांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

पुण्यात अपघातांची मालिका सुरूच

पुण्यात अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. कल्याणीनगर अपघातानंतर पुण्यात २५ दिवसात ७० अपघात झाल्याची घटना घडली आहे. कल्याणीनगर भागातील ७० अपघातात तब्बल ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील विविध भागातही अपघात झाले असून ५४ जण गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहत. हे अपघात १९ मे ते १४ जून दरम्यान अपघात घडले आहेत. काही चालक पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर काही फरार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांचा पुन्हा होणार खोळंबा, आज रेल्वेच्या या मार्गावर ब्लॉक; अनेक लोकल रद्द

Weather Alert : मुंबई, कोकणासह विदर्भातील १८ जिल्ह्यांत आज तुफान पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Numerology : या तारखेला जन्मलेले व्यक्ती असतात धोरणी अन् हुशार; तुमचा भाग्यांक कोणता? जाणून घ्या...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, या राशीच्या व्यक्तींच्या मनातील इच्छा होणार पूर्ण; फक्त कर्म चांगले ठेवा

Horoscope Today : कोणाच्या राशीत आज काय? वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT