Pune Mumbai Expressway Saam tv
मुंबई/पुणे

Pune Mumbai Expressway Block: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक; कारसाठी जुना महामार्ग पर्याय

Maval Pune News : आज मंगळवारी दोन तासांचा ब्लॉक घेतल्याने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांनी ब्लॉकच्या वेळा पाहून प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे

दिलीप कांबळे

मावळ : पुणे- मुंबई एक्सप्रेस हायवेवर मुंबई लेनवर आयटीएमएस प्रोजेक्ट अंतर्गत खंडाळा हद्दीत गन्ट्री (Mumbai Pune Expressway) बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत मुंबई लेनवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. (Live Marathi News)

पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहनधारकांची द्रुतगती महामार्ग महत्त्वाचा मानला जातो. अनेक प्रवासी नागरीक या मार्गावर दररोज ये जा करत असतात. या द्रुतगती महामार्गावर नेहमीच वाहनांची मोठी गर्दी असते. या दरम्यान आज मंगळवारी दोन तासांचा ब्लॉक घेतल्याने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांनी ब्लॉकच्या वेळा पाहून प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खंडाळा हद्दीत दोन तासांचा १२ ते २ या वेळेत ब्लॉक घेण्यात आल्याने या यावेळेत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद असेल. जड-अवजड वाहने ही उर्से टोल नाका तसेच शोल्डर लेनवर थांबविण्यात येणार आहेत. तर केवळ कारसाठी किमी ५५ लोणावळा एक्झिट येथून जुना पुणे मुंबई महामार्ग - अंडा पॉईंट मार्गे मुंबई बाजूकडे वाहतूक सुरू राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईतील ७९ नगरसेवकांचं पद जाणार? निवडणुकीतील गैरप्रकारांच्या आरोपाने खळबळ

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

SCROLL FOR NEXT