Deccan Queen Express Pragati Express Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे मुंबई धावणारी डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्सप्रेस ६ दिवस रद्द

Rohini Gudaghe

सचिन जाधव साम टीव्ही, पुणे

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. पुणे ते मुंबई धावणारी डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्सप्रेस काही दिवस रद्द करण्यात आली आहे. सीएसएमटीवरील कामामुळे रेल्वे प्रशासनाने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. प्रवाशांनी याची नोंद घेवून प्रवासाचं नियोजन करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल प्लॉट क्रमांक १० आणि ११ वर विस्तारीकरणाचं काम सुरू (Pune News) आहे. त्यामुळे पुणे ते मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन दोन दिवस तर प्रगती एक्सप्रेस सहा दिवस रद्द करण्यातचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. काही गाड्या सीएसएमटी स्थानकाऐवजी दादरपर्यंत धावणार आहेत. त्यामुळे पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांची काही दिवस गैरसोय होणार (Mumbai Deccan Queen) आहे.

रद्द केलेल्या गाड्या कोणत्या आहेत?

पुणे मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस २८ मे ते २ जून दरम्यान बंद असणार आहे. तर पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस ३१ ते २ जून दरम्यान बंद असणार आहे. पुणे मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस १ (Pune Mumbai Deccan Queen Express) आणि २ जूनला रद्द करण्यात आलेली आहे. तर पुणे मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस १ आणि २ जूनला बंद असणार आहे, तर कुर्ला मडगाव कुर्ला या गाड्या १ आणि २ जूनला रद्द करण्यात आली आहे.

मुंबई-पुणे-मुंबई या प्रवाशांसाठी ही मोठी बातमी आहे. प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे पुणे-मुंबई डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्सप्रेस ठरावीक कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या (Pragati Express) आहेत. उन्हाळी सुट्टी सुरू असल्यामुळे प्रवाशांची संख्या जास्त आहे. परंतु या गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना काहीसा अडचणींचा सामना करावा लागणार आहे. सीएसएमटीवरील कामामुळे या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT