भरत मोहोळकर, साम टीव्ही
पुणे : वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणेंची मोठी सून मयुरीनं सासरा राजेंद्र हगवणेंच्या काळ्या कारनाम्यांची माहितीच साम टीव्हीशी बोलताना उघड केलीय. एवढंच नाही तर हगवणेंच्या छळछावणीत वैष्णवी आणि स्वतःवर कसा अत्याचार होत होता, याची आपबितीच मयुरीनं सांगितलीय.
२०२२ मध्ये लग्न झाल्यानंतर मयुरीचा छळ सुरु झाला. सततची शिवीगाळ, बेदम मारहाण असह्य झाली. त्यामुळे मयुरीनं आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात जानेवारीमध्येच राजेंद्र आणि शशांक हगवणेविरोधात पौड पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र पोलीसांनी तक्रार घेतली नसल्याचा गंभीर आरोप मयुरीनं केलाय. लहान जाऊ वैष्णवीच्या मृत्यूनंतर मयुरीनं आपल्यासोबत घडलेल्या छळाची कहाणीच सांगितलीय.
हगवणेंची छळछावणी, मयुरीची कहाणी
वैष्णवी आणि मला एकत्र बोलू देत नव्हते
नणंद, सासू, सासरे आणि वैष्णवीचा नवरा तिला मारहाण करायचे
हुंड्यासाठी तिचा कायम छळ करायचे
वैष्णवीचा नवरा मलाही मारायचा
माझ्या नवऱ्यालाही शशांककडून मारहाण
कुटुंबातील लोकांची प्रवृत्ती माहित असल्याने नवऱ्यानं माहेरी सोडलं
एकाच घरात दोन सुनांवर टोकाचा अत्याचार होत होता. मयुरीचे कपडे फाटेस्तोवर राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणेनं मारहाण केली होती. त्यानंतरही पोलिसांनी कारवाई ऐवजी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव होता का? पोलिसांनी मयुरीच्या विनयभंग प्रकरणी कारवाई का केली नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत.. मात्र मयुरीच्या प्रकरणात कारवाई न केल्यामुळेच वैष्णवीचा बळी गेलाय. आता राजेंद्र, शशांक, लता, करिश्मा हगवणेंना मयुरीचा छळ आणि वैष्णवीचा घेतलेला बळी या दोन्ही प्रकरणात कठोर शिक्षा करण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.