Poona Hospital Bridge  
मुंबई/पुणे

Pune Mula Mutha River Video: पुना हॉस्पिटलच्या पुलावरुन मुलगा नदीच्या पाण्यात पडला; शोधकार्य सुरू

Poona Hospital Bridge : पुण्यामधील पुना हॉस्पीटलच्या पुलावरुन एक १२ वर्षाचा मुलगा मुठा नदीच्या पाण्यात पडल्याची घटना घडलीय.

Bharat Jadhav

नितीन पाटणकर, साम प्रतिनिधी

पुणे शहरातील पुना हॉस्पिटलच्या पुलावरून एक मुलगा मुठा नदीच्या पाण्यात पडल्याची घटना घडली. आज सायंकाळी ०५•१८ वाजता सदाशिव पेठमधील पुना हॉस्पिटल येथील पुलावरून एक मुलगा पाण्यात पडल्याची घटना घडली. या मुलाचं वय अंदाजे वय १२ वर्ष सांगितलं जात आहे. अग्निशमन दलाकडून दोन पथके रवाना करण्यात आली असून शोधकार्य सुरू आहे.

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. यामुळे पुणे शहरातील दोन प्रमुख नद्या मुळा आणि मुठा यांना पाणी आलं आहे. नद्यांना पूर आल्याने पुण्याशहरातील भिडे पूल पाण्याखाली गेलाय.यामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम झालाय. दोन्ही नद्यांना दुथडी भरून वाहत आहेत. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात. त्याचदरम्यान पुना हॉस्पिटलच्या पुलावरून १२ वर्षाचा मुलगा मुठा नदीच्या पाण्यात पडल्याची घटना घडलीय. घटना घडल्याचं समजताच अग्निशामक दलाने शोध कार्य सुरू केलंय.

राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे, सातारा, सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून धुवाँधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ८० टक्के पेक्षा आधिक पाणीसाठा तयार झाला आहे.

पुण्यातील चार धरणं मिळून ८६.५१ टक्के इतका पाणीसाठा तयार झालाय. गेल्या वर्षी याच काळात ७४.१७ टक्के इतका पाणीसाठा होता. पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य धरणांपैकी खडकवासला धरणात ८६.२४ टक्के, पानशेत धरणात ९४.९९ टक्के, वरसगाव धरणात८१. ४६ टक्के आणि टेमघर धरणात ८०. ०३ टक्के इतका पाणीसाठा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत सिद्धिविनायक दर्शनासाठी दाखल

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

SCROLL FOR NEXT