MPSC Exams Saam tv
मुंबई/पुणे

MPSC Exam: ४० लाख रुपये द्या, प्रश्नपत्रिका देतो; विद्यार्थ्यांना फोन, पुण्यात खळबळ

Maharashtra Public Service Commission Exam Paper: पुण्यामध्ये एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फोन आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ४० लाख द्या प्रश्नपत्रिका देतो, असे या विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीकडून महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी असणारी प्रश्नपत्रिका आदल्या रात्री उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना आमिष दाखवणारे फोन आल्याची धक्कादायक माहिती साम टिव्हीच्या हाती लागली आहे.

नमस्कार सर मी रोहन कन्सल्टन्सी नागपूरमधून बोलत आहे. आपले बोलणे झाल्याप्रमाणे आपण महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेचा पेपर आम्ही आपणास उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक व्हॉट्सअप कॉलवर एक मिटिंग करावी लागेल. त्यानंतर ठरल्याप्रमाणे होईल. असे संभाषण रेकॉर्ड झालेला महिलेच्या आवाजातील एक कॉल विद्यार्थ्याला आला आहे.

तर त्याच विद्यार्थ्याला दुसरा फोन आला. त्यात आपण 'गट ब'च्या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. आपण या पदाची तयारी करत आहात. तर आपल्यासाठी एक ऑफर आहे. आम्ही या परीक्षेची प्रश्नपत्रिका २ फेब्रुवारी पूर्वी उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील. आपल्याला विश्वास नसेल तर या परीक्षेला एक ही रुपया नाही दिला तरी चालेल. फक्त आपले ओरिजनल कागदपत्रे जमा करावे लागतील. त्यानंतर मुख्य परीक्षेला देखील प्रश्नपत्रिका दिली जाईल. असे एका पुरुषाच्या आवाजातील संभाषण रेकॉर्ड झालेलं आहे.

या संबंधित विद्यार्थी तुम्ही माझे मित्र तर नाही ना, की उगाच मस्करी करत आहात, अशीही विचारणा करत आहे. 'तर मी तुमचा कोणी मित्र नाही, तुमची तयारी असेल, नोकरी हवी असेल तर सांगा पुढची प्रक्रिया करूयात. तुमची सर्व माहिती आमच्याकडे आहे. फक्त या फोन कॉलबद्दल कोणाला काही बोलू नका.', असे सांगितले जात आहे.

या फोन कॉलमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून नोकर भरतीत मोठा घोटाळा होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या फोन कॉलची सत्यता पडताळण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांकडून एमपीएससीला अर्ज केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यसभेत शरद पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

अंजनगाव पुतळा प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून बाळराजे आवारे पाटील यांना अटक

Belly Fat: वजन होईल एका आठवड्यात कमी, सकाळच्या नाश्त्यात बनवा भाज्यांचे थालीपीठ

Salman Khan : 3,225 कोटींचा मालक अन् पायात फाटके बूट; सलमान खानची अवस्था पाहून चाहते चक्रावले, VIDEO होतोय व्हायरल

Gold Rate Today: खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं १८००० रुपयांनी स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT