crime update saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: होणाऱ्या नवऱ्यासोबत रात्री घराबाहेर पडली, वाटेत गुंडांनी अडवले अन्....

Woman harassment Pune Crime Case: पुण्यातील वानवडीत एका तरूणीसोबत विनयभंगाचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

Bhagyashree Kamble

अक्षय बडवे, साम टीव्ही

स्वारगेट बस डेपोत शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर पुण्यातील वातावरण तापलंय. आता विनयभंगाच्या प्रकरणामुळे पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे. वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरूणीसोबत विनयभंगाचा प्रकार घडला आहे. पीडित तरूणी वैयक्तिक कामानिमित्त होणाऱ्या नवऱ्यासोबत घराबाहेर पडली होती. यादरम्यान, आरोपीने अडवले आणि तरूणीचा विनयभंग केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

२ मार्चला वानवडीत तरूणी आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत घराबाहेर पडली होती. वैयक्तिक कामानिमित्त ती घराबाहेर पडली असल्याचं तिनं सांगितलं. रस्त्यावरून जात असताना अचानक आरोपी राहुल तिथे पोहोचला. त्याने काहीही कारण नसताना तरूणीची वाट अडवली. त्यावेळी तरूणीसोबत तिचा होणारा नवराही उपस्थित होता. आरोपी तरूणीला शिवीगाळ करू लागला.

तरूणीच्या होणाऱ्या नवऱ्यानं त्याला शिवीगाळ करू नको, असे सांगितले. यानंतर संतापलेल्या आरोपीनं तरूणाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. तरूणीसोबतही गैरवर्तन करून दमदाटी केली. पीडित तरूणी घाबरली आणि दोघांनी तेथून पळ काढला.

दुसऱ्या दिवशी तरूणीनं वानवडी पोलीस ठाणे गाठले. तसेच आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस आयुक्तांच्या सुचनेनुसार तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. पोलिसांनी अवघ्या २ तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. त्याची चौकशी केली असता आरोपी सराईच गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केले. लष्कर न्यायालयात आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने हे स्वीकारून आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशी माहिती परिमंडळ पाचचे उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Mumbai Local: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार, तिघांकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT