Kaustubh Gawde  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune MLC Election Result: मोठी बातमी! पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपची जादू, कौस्तुभ गावडे विजयी; सचिन सानपांचा पराभव

Kaustubh Gawde wins Pune Teachers’ Constituency election: पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा विजय झाला. त्यांनी सचिन सानप यांचा पराभव केला.

Priya More
  • पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा निकाल जाहीर

  • भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा पुणे शिक्षक मतदारसंघात विजय

  • शिंदेसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांचा पराभव झाला

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा विजय झाला. कौस्तुभ गावडे यांनी शिंदेसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांचा पराभव केला. मतमोजणीदरम्यान कौस्तुभ गावडे पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या क्रमांकावर सचिन सानप आणि तिसऱ्या क्रमांकावर दत्तात्रय सावंत होते. या निवडणुकीत भाजपची जादू पाहायला मिळाली. कौस्तुभ गावडे यांचा विजय होताच भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

पुणे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना २३,२०० मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिंदेसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांना १७,००० मतं मिळाली. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरशीची लढत झाली. कारण कौस्तुभ गावडे यांनी सचिन सानप आणि दत्तात्रय सावंत या दोघांचा दारूण पराभव करत विजय मिळवला. निकाल जाहीर होताच सचिन सानप यांनी नाराजी व्यक्त केली आणि अनेक गंभीर आरोप केले.

पुणे पदवीधर शिक्षक मतदार संघातून भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे हे विजयी झाले. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दारात मोठा जल्लोष सुरू करण्यात आलेला आहे. राज्यातील कमी वयाचे आमदार म्हणून कौस्तुभ गावडे यांना बहुमान मिळणार असून इथून पुढे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या मार्फत आपण शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच कार्यरत राहू असा विश्वास कौस्तुभ गावडे यांच्या पत्नी मयुरी गावडे यांनी साम टीव्ही सोबत बोलताना व्यक्त केला आहे.

विजयी उमेदवार कौस्तुभ गावडे यांचे सचिन सानप यांनी अभिनंदन केले. पराभव झालेल्या सचिन सानप यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, मुख्य लढत ही भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे आणि माझ्यात होती. त्यामुळे मतांच्या विभागणीचा प्रश्नच येत नाही. निवडणुकीत पैसे वाटल्याचे म्हटले जात आहे पण शिक्षकांना बदनाम करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. एक खंत मनात आहे की शिक्षकांनी शिक्षक आमदार निवडला नाही. कौस्तुभ गावडे यांच्या विजयाची घोषणा काही वेळात होईल. पण आम्ही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी काम करतच राहू.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : तुमचे चांदीचे दागिने काळे पडत आहेत का? दिवाळीपूर्वी ते घरीच स्वच्छ करा नव्यासारखे

Neeraj Yadav Death: तीन गोल्ड मेडल जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूची आत्महत्या; राहत्या घरी सापडला मृतदेह

Maharashtra News Live Update: पिंपरी-चिंचवडमध्ये दोन ठिकाणी आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

Bank Holidays November: नोव्हेंबरमध्ये बँका तब्बल १६ दिवस बंद! दिवाळी, भाऊबीज ते गुरु नानक जयंती, एका क्लिकवर पाहा संपूर्ण सुट्टीची यादी

Shocking : नाशिक हादरलं! इंजिनिअरने राहत्या घरी संपवलं आयुष्य, मृत्यपूर्वी लिहलं पत्र; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT