Pune Mhada Lottery Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Mhada Lottery: पुण्यात घराचं स्वप्न साकार होणार! म्हाडाची ४१८६ घरांसाठी बंपर लॉटरी; वाचा सविस्तर

Pune Mhada Lottery For 4186 Houses: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यात हक्काचे घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. पुण्यात ४१८६ घरांसाठी लॉटरी निघाली आहे.

Siddhi Hande

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी

पुण्यात हक्काचे घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण

४१८६ घरांसाठी निघाली लॉटरी

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे.पुणेकरांचे आता घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. पुणेकरांसाठी म्हाडाने लॉटरी जाहीर केली आहे. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाने सोडतीची घोषणा केली आहे. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाने ४१८६ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

पुण्यात किती घरांसाठी लॉटरी? (Pune Mhada Lottery)

या सोडतीत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २१९ घरे आहे. म्हाडा गृहनिर्माण प्रकल्पाअंतर्गत १६८३ घरे आहे. तर ८६४ घरे हा सामाजिक गृहनिर्माण प्रकल्पाअंतर्त बांधली जाणार आहे. तर २० टक्के घरे ही सर्वसामावेशक योजनेत बांधली जाणार आहेत. यासाठी ३३२२ घरे आहेत.यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

अर्जप्रक्रिया

पुण्यातील घरांच्या सोडतीसाठी अर्जप्रक्रिया ११ सप्टेंबर २०२५ पासून सुरु होणार आहे. या दिवशी अर्जदेखील स्विकारले जाणार आहे. या सोडतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. यानंतर अर्ज स्विकारले जाणार आहे. या घरांसाठी अर्ज करताना तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरायचे आहे. १ नोव्हेंबरपर्यंत तुम्ही शुल्क भरावेत.

पुण्यातील या घरांच्या सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची यादी ११ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर हरकती नोंदवण्याची शेवटची तारीख १३ नोव्हेंबर असणार आहे. अर्जांची शेवटची यादी १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल.

पुण्यातील या घरांची सोडत २१ नोव्हेंबर २०२ रोजी होणार आहे. तुम्ही या दिवशी संध्याकाळी ६ वाजता वेबसाइटवर जाऊन लॉटरीची माहिती मिळवू शकतात. यावरुन तुम्हाला कोणाला घरे मिळाली याची माहिती मिळेल. या घरांसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे. याबाबतची सर्व माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर मिळेल. त्यानुसार तुम्ही अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही? कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच, पाच जणांना घेतला चावा

Hruta Durgule: ‘आली मोठी शहाणी’च्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा ! हृता दुर्गुळे - सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र

Mumbra Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघातात मोठी कारवाई, २ इंजिनिअर आणि अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

Garlic Chutney: वरण भातासोबत पापड नको, फक्त ५ मिनिटांत तयार करा झणझणीत लसूण आणि पुदिना चटणी

SCROLL FOR NEXT