Pune Metro Security Guard Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Metro : प्लॅटफॉर्मवर खेळताना मेट्रोच्या रुळावर पडला चिमुरडा; सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानाने वाचला जीव

Pune Metro Security Guard: पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर याने प्रसंगावधान राखत ३ वर्षांच्या मुलाचे आणि त्याच्या आईचे प्राण वाचवले. सुरक्षा रक्षकाच्या या धाडसी कार्याबद्दल महा मेट्रोतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

Bharat Jadhav

(गोपाल मटघरे, पुणे)

Pune Metro Security Guard Saved 3 years Boys life :

पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर याने प्रसंगावधान राखत तीन वर्षांच्या मुलाचे आणि त्याच्या आईचे प्राण वाचवले. आज रोजी दुपारी २.२२ मिनिटांनी सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानक येथे फलाट क्रमांक २ वर एक ३ वर्षाचा मुलगा खेळत होता. त्यावेळी तो प्लॅटफॉर्मवरून रुळावर पडला. त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारी त्याची आईदेखील मेट्रो रेल्वेच्या रुळावर पडली. ही गोष्ट कामावर असलेल्या सुरक्षारक्षकाच्या लक्षात आली. त्यावेळी प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षक विकास बांगर याने त्यांचे प्राण वाचवले. (Latest News)

विकास बांगर, असे पुणे मेट्रो सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. बांगरच्या प्रसंगावधानामुळे ३ वर्षाच्या मुलाचा आणि आईचे प्राण वाचले. सुरक्षारक्षक विकास बांगर यांच्या समयसूचकतेबद्दल आणि धाडसी कार्याबद्दल महा मेट्रोतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, आज सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानकावर प्रवाशी महिला आणि तिचा मुलागा कुठेतरी जात होते. त्या महिलेचा तीन वर्षाचा मुलगा प्लॅटफॉर्मवर खेळत होता. खेळताना तो मेट्रोच्या रुळावर पडला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना त्या मुलाची आईदेखील रुळावर पडली.

ही बाब तेथे कामावर असलेल्या सुरक्षा रक्षकाला समजली, त्याने प्रसंगावधान राखत प्लंजर बटन दाबले. मेट्रोस्थानकावरील प्लंजर बटन दाबल्यामुळे त्या मार्गावरून जाणाऱ्या मेट्रोना सिग्नल मिळाला आणि त्या जागीच थांबून राहिल्या. सुरक्षा रक्षक बांगर यांनी प्लंजर बटन दाबले त्यावेळी स्थानक आणि मेट्रो यामधील अंतर केवळ ३० मीटर इतके होते. मेट्रो ट्रेन थांबल्यानंतर मुलगा आणि आईला सुखरूपरित्या रुळांवरून बाहेर काढण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Foods: हिवाळ्यात टिफिनमध्ये घेऊन जा असे पदार्थ, थंड झाल्यावरही चवीला लागतील छान...

Maharashtra News Live Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी उशिरा मुंबईत येण्याची शक्यता

CM Eknath Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत? संतांच्या वंशजांनी थेट लिहिलं PM नरेंद्र मोदींना पत्र

India Travel : मित्रांसोबत तुफान मजा करा, हिवाळ्यात 'या' बीचला भेट द्या

Wedding: नवराई माझी लाडाची; शेतकरी पत्नीला नेले थेट हेलिकॉप्टरने घरी

SCROLL FOR NEXT