PUNE GETS 50 MBBS SEATS APPROVAL saam tv
मुंबई/पुणे

पुण्यातील मेडिकल कॉलेजच्या MBBS च्या 'इतक्या' जागांना मान्यता; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आगाऊ मदत- CM फडणवीस

Pune Medical College Gets Approval For 50 MBBS Seats: पुण्यातील मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएसच्या ५० जागांना मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची आगाऊ मदत, एमपीएससी पारदर्शकता आणि ऊस गाळप हंगामाबाबत महत्त्वाची माहिती दिली.

Ganesh Kavade, Omkar Sonawane

पुण्यातील मेडिकल कॉलेजमधील MBBS अभ्यासक्रमाच्या 50 जगांना अखेर मान्यता मिळाली आहे. याआधी दोन वेळा मेडिकल कॉलेज कौन्सिलने या जगांना मान्यता नाकारली होती. मात्र आता या जगांना मंजूरी मिळाल्याने पुणेकरांची मागणी पूर्ण झाली आहे. यासाठी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका, ऊस गाळप हंगाम, MPSC परीक्षेतील पारदर्शकता आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बैठक झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे हे भाजप-महायुतीचे उमेदवार मैदानात आहेत. भय्या माने आणि लाड यांनीही विनंतीला मान देत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. भाजपचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचून प्रचार करतील. पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, अमरावतीमध्ये शिवसेनेला महायुतीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस उत्पादन कमी झाले असून, गाळप हंगामाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी लवकरात लवकर गाळप सुरू करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. शेतकऱ्यांना योग्य एफआरपी (FRP) दिली जात असल्याचे सांगत त्यांनी सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले. कारखाने 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.

MPSC परीक्षेतील पारदर्शकतेसाठी सरकार कटिबद्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. यासाठी चौकशी समिती आणि व्ही. राधा समिती नेमण्यात आली आहे. भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे वेळेत पूर्ण व्हावेत आणि दरवर्षी जास्तीत जास्त पदांची भरती व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक पाठिंबा राहील, असेही त्यांनी सांगितले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांची आगाऊ मदत

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने शासन निर्णय काढून 12 उपाययोजना सुरू केल्या आहेत. दुष्काळी मदतीचा लाभ 365 तालुक्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यापूर्वी शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपयांची मदत दिली जात होती; मात्र यंदा सरकारने पाच हजार रुपयांची आगाऊ मदत दिली आहे. तांत्रिक कारणांमुळे कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशी सरकारची भूमिका असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे विद्यापीठात आंदोलनं, निदर्शनं आणि सभांना बंदी घालण्याचा प्रस्ताव

Chanakya Niti: या ४ चूका जवळच्या व्यक्तींना करतील लांब, आजच करा बदल अन्यथा

Mumbai : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; चेंबूरमधून दोघांना अटक

“आधी काम दाखवा,मग पद मागा!” फडणवीसांनी पुण्यातील भाजप नगरसेवकांना सुनावलं

Mumbai Temple : नवरात्री स्पेशल! मुंबईतील ७ प्रसिद्ध देवीची मंदिरं, दर्शनासाठी होते भक्तांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT