चिंता नको, काळजी घ्या ! पुणेकरांना महापौरांनी केले आवाहन - Saam TV
मुंबई/पुणे

Pune Corona : चिंता नको, काळजी घ्या ! पुणेकरांना महापौरांनी केले आवाहन

साम टिव्ही

पुणे : नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी त्यात बहुतांश रुग्ण हे लक्षणे विरहित आणि सौम्य लक्षणे असणारे आहेत. तिसऱ्या लाटेची (Corona Third Wave) शक्यता गृहीत धरून आपली आरोग्ययंत्रणा सक्षमपणे सज्ज ठेवली असून पुणेकरांनी चिंता न करता स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन पुण्याचे (Pune) महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी केले आहे. (Pune Mayor Murlidha Mohol Appeal to Pune Citizens over Corona)

ट्वीट करुन महापौरांनी हे आवाहन केले आहे. "महापालिकेकडे सद्यस्थितीत ४ हजार रेमिडिसिव्हीर (Remdisivir) इंजेक्शन, १ हजार ८०० खाटा, ९ हजार ५०० एलपीएमची ऑक्सिजन (Oxygen) निर्मिती क्षमता उपलब्ध आहे. ऑक्सिजन साठवण करण्याची ९ ठिकाणी सोय करण्यात आली आहे. शिवाजीनगर जम्बो हॉस्पिटलमध्येही यंत्रणा सज्ज असून कमी कालावधीत हे हॉस्पिटल सुरु करता येऊ शकते,'' असे महापौरांनी म्हटले आहे.

''एकूण ऑक्सिजन बेड्सची संख्या आणि कोरोना (Corona) सेंटरची संख्या आवश्यकरेनुसार वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भरारी पथके आणखी सक्रिय केली जाणार आहेत. ही पथके नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी सज्ज असतील,'' असेही ट्वीट मोहोळ यांनी केले आहे.

दरम्यान, पुण्यात काल दिवसभरातली (ता. ३ जानेवारी) कोरोना स्थिती

◆ उपचार सुरु : २,८३८

◆ नवे रुग्ण : ४४४

◆ डिस्चार्ज : १२०

◆ चाचण्या : ६,५७३

◆ मृत्यू :

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

SCROLL FOR NEXT