Pune News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : एकीकडे धो धो पाऊस, दुसरीकडे तारामधून ठिणग्या अन् जाळ; मावळमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Rain News Maval Pune: मावळ तालुक्यात पुन्हा एकदा जुन्या विद्युत तारांमधून ठिणग्या व जाळ निघताना दिसल्या. महावितरण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप असून मोठ्या अपघाताची भीती व्यक्त होत आहे.

Alisha Khedekar

  • टाकवे बुद्रुक खंडोबा चौकात पुन्हा जुन्या तारांमधून ठिणग्या दिसल्या.

  • पाच ठिकाणी अचानक वीजतारा तुटल्यामुळे भीतीचं वातावरण.

  • ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारी असूनही महावितरणकडून कारवाई नाही.

  • नागरिकांनी तातडीने नवीन वायर उभारण्याची मागणी केली आहे.

दिलीप कांबळे, मावळ

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात टाकवे बुद्रुक बाजारपेठेतील खंडोबा चौकात पुन्हा एकदा धोकादायक प्रकार घडला. एमएसईबीच्या जुन्या विद्युत तारांमधून ठिणग्या व जाळ निघताना दिसून आले. गेल्या महिन्यात याच ठिकाणी अशीच घटना घडली होती. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

फक्त खंडोबा चौकच नव्हे तर गावातील पाच ठिकाणी अचानक वीजतारा तुटल्या आहेत. यामुळे कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी वारंवार महावितरण विभागाकडे तक्रारी करूनही या संदर्भात ठोस पावले उचलली जात नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

गावात पन्नास वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या जुन्या तारांचा वापर अद्याप सुरू आहे. परंतु गेल्या काही वर्षांत झालेल्या वाढत्या शहरीकरणामुळे व वीज वापरातील प्रचंड वाढीमुळे या जुन्या वायरवर अधिकचा ताण येत आहे. परिणामी अशा धोकादायक घटना घडत आहेत.

भर चौकात वाहतूक सुरू असताना अचानक वायर तुटल्यास नागरिक, व्यापारी आणि वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ग्रामस्थांनी महावितरण विभागाने तातडीने नवीन तारांची उभारणी करून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट! DA मध्ये ५% वाढ, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये एरियर

Ginger Tulsi Tea : सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी किती आरोग्यदायी असतो आलं आणि तुळशीचा चहा ?

भयंकर घडलं! भाजप कार्यकर्त्यावर फायरिंग, जागीच मृत्यू, ६ गंभीर; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: Mumbai: भगवती रुग्णालय ३० वर्षांसाठी खासगी संस्थेला चालवायला देणार

आम्ही बोलायचं का? फडणवीस यांना संपवण्यासाठी कोण ताकद देत होतं? ऑडिओ क्लिपवरून भाजप-शिंदेसेनेत जुंपली

SCROLL FOR NEXT