Omicron news update
Omicron news update saam tv
मुंबई/पुणे

Corona Update : ओमिक्रॉनच्या BA.5 व्हेरियंटचा पुण्यात सापडला आणखी एक रुग्ण

साम टिव्ही ब्युरो

पुणे: आज पुण्यात (Pune) ओमिक्रॉन BA.5 व्हेरियंटचा रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण २ जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. हा रुग्ण सध्या बरा आहे, रुग्णावर घरीच उपचार सुरू आहेत. याअगोदरही पुण्यात नव्या व्हेरियंटचे ५ ते ६ रुग्ण आढळले होते.

आज नव्या व्हेरियंट पॉझिटिव्ह आलेला रुग्ण २१ मे रोजी इंग्लंडहून आला होता. या रुग्णाने कोविशिल्ड या लसीचे दोन्ही डोस घेतले होते. भारतात याअगोदर हैदराबादमध्ये पहिला ओमिक्रॉनचा BA.4 हा व्हेरियंटचा रुग्ण आढळला होता, आता भारतीय SARS-CoV2 जीनोमिक्स कन्सोर्टियमने तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये BA.4 आणि BA.5 या व्हेरियंटचे रुग्ण सापडले होते.

दरम्यान, महाराष्ट्रात आज २,९२२ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून, सध्या राज्यात 14,858 एवढे रुग्ण उपचार घेत आहेत. आज दिवसभरात एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

२४ तासांत ८ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद

देशातील कोरोना रुग्णांची संख्या (corona new patients) सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 8,329 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या 40,370 झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे शुक्रवारी आढळून आलेल्या नवीन प्रकरणांची संख्या गुरूवारी आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत 9.8 टक्के अधिक आहे. दैनिक सकारात्मकता दर 2.41 टक्के आहे. भारतात एकूण केस लोड 4,32,13,435 आहे.

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवाडीनुसार गेल्या 24 तासांत 4 हजार 216 लोकं कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली होती. मात्र गेल्या बुधवारी देशात एकाच दिवशी पाच हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. त्यानंतर कोरोना रुग्णसंख्या वाढतच गेली. दरम्यान, नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 4 कोटी 42 लाखांवर पोहचला आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 24 हजार 747 आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : काँग्रेस मजबूत, तर देश मजबूत होईल; शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Nashik Crime News : गुन्हेगार मित्रांची संगत नडली, नाशिकमध्ये ६ जणांसह ८७ गुंड तडीपार

Hingoli Water Crisis : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बनला गंभीर; हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणात पाण्याचा मृतसाठा

Relationship Tips : काय सांगता! किस केल्याने वजन कमी होतं; संशोधनातून मिळाली महत्वपूर्ण माहिती

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला कार खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त कधी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT