Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : डोक्यात तिडिक केली, अत्याच्या मुलाने रोहनची निर्घृण हत्या केली, पेव्हर ब्लॉकनं मारलं

Pune crime news today : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात जुन्या वादातून तरुणाची पेव्हर ब्लॉकने हत्या करण्यात आली. आरोपी नातेवाईकाला पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Market Yard Pune latest news : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात पहाटे एका तरूणाची निर्घृण हत्या केल्याचे उघड झालेय. हत्या झालेल्या मुलाचे नाव रोहन ओव्हळ असे आहे. रोहण याला अत्याच्या मुलाने संपवल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. (Bibwewadi Kondhwa crime updates)

पोलिसांनी आरोपी कौशल लांडगे याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास कऱण्यात येत आहे. पहाटेच्या सुमारास कौशल याने रोहन याची पेव्हर ब्लॉक डोक्यात घालून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कौशल कमलेश लांडगे याने रोहन कांतीलाल ओव्हळ याची पेव्हर ब्लॉक व लाकडी बॅटम पट्टीने मारहाण करत हत्या केली. आज पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास ही घटना घडली. मार्केटयार्ड परिसरात बिबवेवाडी-कोंढवा रोड येथील एका सोसायटीजवळ पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आलाय. पुण्यातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन कांतीलाल ओव्हाळ,वय २८ वर्षे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर त्याचा आत्ये भाऊ कौशल कमलेश लांडगे याने पूर्वीच्या भांडणाचे रागातून हत्या केली. आत्ये भाऊ कौशल कमलेश लांडगे व त्याच्या इतर मित्रांनी रोहन याचा बॅटम पट्टीने शरीरावर व पेव्हर ब्लॉकने डोक्यात मारून त्याचा खून केलाय. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे सध्या कोर्टात हजर

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT