PMC News  x
मुंबई/पुणे

PMC Elections : पुण्यात अनेक दिग्गजांना धक्का, PMC निवडणुकीचे आरक्षण जाहीर, वाचा कोणता प्रभाग कुणाला राखीव

Maharashtra announces new reservation for PMC elections, prioritizing SC, ST, and women in ward allocation : पुणे महानगरपालिका निवडणूक 2025 साठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. एकूण १६५ जागांपैकी ८३ जागा महिलांसाठी राखीव आहेत. ओबीसी, अनुसूचित जाती-जमातींच्या जागांची डिटेल माहिती. कोणत्या प्रभागात कोणाला आरक्षण मिळाले ते जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

  • पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी १६५ जागांचे आरक्षण जाहीर झाले.

  • महिलांसाठी एकूण ८३ जागा राखीव असून ओबीसीसाठी ४४ जागा आहेत.

  • अनेक माजी नगरसेवकांच्या जागा आरक्षण बदलामुळे धोक्यात आल्या आहेत.

  • अंतिम प्रभाग रचना २ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

सचिन जाधव, पुणे प्रतनिधी, साम टीव्ही

pune municipal corporation election aarakshan list : पुणे महानगरपालिकेचा धुरळा लवकरच उडणार आहे. आयोगाकडून आणि प्रशासनाकडून याची तयारी अंतिम टप्प्यात आहेच. राजकीय पक्षाकडूनही उमेदवारांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. अशातच पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. या आरक्षण सोडतीत पुण्यातील अनेक दिग्गजांना फटका बसलाय. आरक्षण सोडतीनंतर अनेक माजी नगरसेवकांच्या जागा अडचणीत आल्या आहेत. १६५ जागेसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. यात महिलांसाठी ८३ जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी २२ जागा आहेत, त्यापैकी ११ जागा महिलांसाठी आहेत. अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आहेत, यापैकी एक जागा महिलांसाठी आहे. नागरिक मागासवर्ग प्रभागासाठी ४४ जागा आहेत, त्यापैकी २२ जागा महिलांसाठी आहेत. 97 जागांपैकी 49 जागा महिलांसाठी आहेत. (Pune Municipal Election 2025 Reservation List Ward Wise)

अनेक नगरसेवकांना नगरसेवकांना सर्वसाधारण आरक्षणातून निवडणूक लढवावी लागणार आहे. माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, माजी उपमहापौर सिद्धार्थ धेडे,माजी नगरसेवक अविनाश बागवे, सनी निम्हण,युवराज बेलदरे,प्रकाश ढोरे,प्रकाश कदम यांना आता सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे. यावेळी धंगेकर आणि बिडकर हाय होल्टेज सामना होणार नाही. प्रभाग क्र. 24 मध्ये ओबीसी महिला आरक्षण पडल्याने धंगेकर यांच्या पत्नी तर सर्वसाधारण जागेवरून गणेश बिडकर यांना निवडणुक लढवावी लागेल. २०१७ ला मोदी लाटेत धंगेकर यांनी गणेश बिडकर यांचा पराभव केला होता. पुणे महानगरपालिका निवडणूक युती आघाडीत काय होतं याकडे आता लक्ष लागलेय.

२ डिसेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना

लोकांच्या समोर नियमानुसार आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. हे सगळं निवडणूक आयोगाकडे पाठवणार आहोत, याची मान्यता झाल्यानंतर पुणेकरांकडून हरकती सूचनाही मागवण्यात येतील. १७ नोव्हेंबर रोजी प्रभाग आराखडा जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सोडतीनंतर दिली. १७ तारखेपासून २४ तारखेपर्यंत हरकती सूचना मागवण्यात येतील. २ डिसेंबरला प्रभाग रचना अंतिम जाहीर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे ४१ प्रभागासाठी १६५ जागांचे आरक्षण जाहीर

प्र.क्र १कळस-धानोरी - लोहगाव उर्वरित

अ. महिला अनुसूचित जाती (SC)

ब. अनुसूचित जमाती (ST)

क. महिला ओबीसी

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. २ फुलेनगर - नागपूर चाळ

अ. महिला अनुसूचित जाती (SC)

ब. ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र.क्र.३ विमाननगर -लोहगाव

अ. ओबीसी महिला

ब. ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. ४ खराडी - वाघोली

अ. अनुसूचित जाती (SC)

ब. महिला ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. ५ कल्याणीनगर - वडगावशेरी

अ. ओबीसी

ब. सर्वसाधारण महिला

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. ६ येरवडा- गांधीनगर

अ. अनुसूचित जाती (SC)

ब. महिला ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. ७ गोखलेनगर - वाकडेवाडी

अ. महिला अनुसूचित जाती (SC)

ब. महिला ओबीसी

क. सर्वसाधारण

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. ८ औंध -बोपोडी

अ. अनुसूचित जाती (SC)

ब. महिला ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. ९ सुस -बाणेर - पाषाण

अ. महिला अनुसूचित जमाती (ST)

ब. ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. १० बावधन - भुसारी कॉलनी

अ. ओबीसी

ब. सर्वसाधारण महिला

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. ११ रामबाग कॉलनी - शिवतिर्थनगर

अ. ओबीसी

ब. सर्वसाधारण महिला

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. १२ छ. शिवाजीनगर - मॉडेल कॉलनी

अ. महिला अनुसूचित जाती (SC)

ब. ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. १३ पुणे स्टेशन - जय जवान नगर

अ. अनुसूचित जाती (SC)

ब. महिला ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. १४ कोरेगाव पार्क - घोरपडी - मुंढवा

अ. महिला अनुसूचित जाती (SC)

ब. ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. १५ मांजरी बु. - केशवनगर - साडेसतरा नळी

अ. महिला अनुसूचित जाती (SC)

ब. ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. १६ हडपसर - सातववाडी

अ. महिला ओबीसी

ब. सर्वसाधारण महिला

क. सर्वसाधारण

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. १७ रामटेकडी - माळवाडी - वैदुवाडी

अ. अनुसूचित जाती (SC)

ब. महिला ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. १८ वानवडी - साळुंखे विहार

अ. ओबीसी

ब. सर्वसाधारण महिला

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. १९ कोंढवा खुर्द - कौसरबाग

अ. महिला ओबीसी

ब. सर्वसाधारण महिला

क. सर्वसाधारण

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. २० शंकर महाराज मठ - बिबवेवाडी

अ. ओबीसी

ब. सर्वसाधारण महिला

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. २१ मुकंदनगर - सॅलसबरी पार्क

अ. अनुसूचित जाती (SC)

ब. महिला ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. २२ काशेवाडी - डालस प्लॉट

अ. महिला अनुसूचित जाती (SC)

ब. ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र.क्र. २३ रविवार पेठ - नाना पेठ

अ. अनुसूचित जाती (SC)

ब. महिला ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र. क्र. २४ कसबा गणपती - कमला नेहरु हॉस्पिटल- के.ई.एम हॉस्पिटल

अ. महिला ओबीसी

ब. सर्वसाधारण महिला

क. सर्वसाधारण

ड. सर्वसाधारण

प्र. क्र. २५ शनिवार पेठ - महात्मा फुले मंडई

अ. ओबीसी महिला

ब. ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र. क्र. २६ घोरपडे पेठ - गुरुवार पेठ - समता भूमी

अ. अनुसूचित जाती (SC)

ब. महिला ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र. क्र. २७ नवी पेठ - पर्वती

अ. अनुसूचित जाती (SC)

ब. महिला ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र. क्र. २८ जनता वसाहत - हिंगणे खुर्द

अ. महिला अनुसूचित जाती (SC)

ब. ओबीसी महिला

क. सर्वसाधारण

ड. सर्वसाधारण

प्र. क्र. २९ डेक्कन जिमखाना - हॅप्पी कॉलनी

अ. ओबीसी

ब. सर्वसाधारण महिला

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ३० कर्वेनगर - हिंगणे होम कॉलनी

अ. ओबीसी

ब. सर्वसाधारण महिला

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ३१ मयूर कॉलनी - कोथरुड

अ. ओबीसी

ब. सर्वसाधारण महिला

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ३२ वारजे - पॉप्युलर नगर

अ. महिला अनुसूचित जाती (SC)

ब. ओबीसी

क. सर्वसाधारण

ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ३३ शिवणे - खडकवासला - धायरी (पार्ट)

अ. महिला ओबीसी

ब. सर्वसाधारण

क. सर्वसाधारण

ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ३४ नऱ्हे - वडगाव बुद्रुक - धायरी

अ. ओबीसी

ब. सर्वसाधारण महिला

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ३५ सनसिटी - माणिक बाग

अ. महिला ओबीसी

ब. सर्वसाधारण महिला

क. सर्वसाधारण

ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ३६ सहकारनगर - पद्मावती

अ. अनुसूचित जाती (SC)

ब. महिला ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ३७ धनकवडी - कात्रज डेअरी

अ. ओबीसी

ब. सर्वसाधारण महिला

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ३८ बालाजीनगर - आंबेगाव - कात्रज

अ. ओबीसी महिला

ब. ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण महिला

इ. सर्वसाधारण

प्र. क्र. ३९ अप्पर सुपर इंदिरानगर

अ. महिला अनुसूचित जाती (SC)

ब. ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ४० कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी

अ. अनुसूचित जाती (SC)

ब. महिला ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

प्र. क्र. ४१ महंमदवाडी - उंड्री

अ. महिला अनुसूचित जाती (SC)

ब. ओबीसी

क. सर्वसाधारण महिला

ड. सर्वसाधारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पारोळा-एरंडोल नगरपरिषद निवडणुकीत भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेची युती

Chanakya Niti: 'या' ३ गोष्टी देतात वाईट काळाची चाहूल, वेळेत ओळखा संकेत! नाही तर...

Shocking : गर्लफ्रेंडशी बोलल्याने बॉयफ्रेंडला खटकलं; रागाच्या भरात शाळेतील बेस्टफ्रेंडला संपवलं

वा रे लखन वा! डबल हिंद केसरी लखन बैलानं जिंकली फॉर्च्युनर आणि चांदीची गदा

एकनाथ शिंदेंनी केली संजय राऊतांच्या तब्येतीबाबत विचारपूस; काय झालं नेमकं बोलणं? VIDEO

SCROLL FOR NEXT