Pune lockdown  Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Fact Check : पुण्यात १४ दिवसांचा लॉकडाऊन? राज्य सरकारनं केलं स्पष्ट, जाणून घ्या सत्य

Pune Lockdown News Fact Check : इंधन संकटामुळे पुण्यात लॉकडाऊन लागू झाल्याची सोशल मीडियावरील बातमी खोटी असल्याचे महाराष्ट्र सरकार आणि पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शहरात केवळ कायदा व सुव्यवस्थेसाठी काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Namdeo Kumbhar

Pune lockdown viral message fact check : इंधन संकटामुळे पुण्यात अचानक 'लॉकडाऊन' (Pune Lockdown) लागू करण्यात आल्याची एक बातमी सध्या सोशल मीडियावर वणव्यासारखी पसरली आहे. या बातमीमुळे पुणेकरांमध्ये प्रचंड संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण सोशल मीडियावरील हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आता समोर आले आहे. 'महाडीजीआयपीआर' (MahaDGIPR Fact Check) आणि पुणे पोलिसांनी यावर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. नक्की पुण्यात काय परिस्थिती आहे? पोलिसांनी कोणते निर्बंध लावले आहेत आणि त्या व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

पुण्यात लॉकडाऊन लागल्याची बातमी खोटी

पुण्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आणि खोटा आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR Fact Check) या अफवेचे खंडन केले आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात कोणताही लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गर्दी नियंत्रणासाठी काही विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सरकारने नेमकं स्पष्टीकरण काय दिले -

इंधन संकटामुळे पुण्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्याचा सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणारा आहे. पुणे पोलिसांनी असा कोणताही लॉकडाऊन लागू केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गर्दी नियंत्रणासाठी काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

पुण्यात जमावबंदी आदेश

पुण्यात १४ दिवसांपासून मंगळवारी रात्रीपासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. पण पुण्यात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही. पुण्यात जमावबंदी काळात आंदोलन मोर्चे सभांना बंदी घालण्यात आली आहे. सध्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात राजकीय संघटना आणि सामाजिक संघटनांकडे आंदोलन करण्यात येते त्या पार्श्वभूमीवर आदेश काढलेत का असा प्रश्न विचारला जातोय. या आदेशानुसार नुसारशस्त्रे बाळगणे दगड, स्फोटके, लाठ्या इ. ठेवणे ,भडकाऊ घोषणा, गाणी, भाषणे,सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कृती यांवर बंदी लागू करता येते. जर एखाद्या व्यक्तीने वरील बंदीचे उल्लंघन करून शस्त्र किंवा धोकादायक वस्तू बाळगल्या तर: पोलीस त्या वस्तू जप्त करू शकतात संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : मुबंई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Diabetes-High BP : मधुमेह अन् बीपी कंट्रोल करतील 'हे' ५ सुपरफूड, वजनही होईल झटपट कमी

NEET Paper Update : NEET पेपरफुटी प्रकरणातील मोठी अपडेट! २ शिक्षकांना अटक, आरोपी प्रोफेसरचा नंबर 'गॉड' नावाने सेव्ह

किडनीतील घाण बाहेर काढतील 'या' ५ भाज्या; रोज खाल्ल्यास मूत्रपिंड राहील एकदम स्वच्छ!

Gold Price Today: सोनं झालं स्वस्त! प्रति तोळा इतक्या रूपयांवर, जाणून घ्या २४ आणि २२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT