Pune Liquid Liger Hotel Narcotics 
मुंबई/पुणे

Pune Liquid Liger Hotel Video: 'पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाला शंभूराज देसाई जबाबदार'; अंधारे, धंगेकरांकडून देसाईंच्या राजीनाम्याची मागणी

Pune Liquid Liger Hotel Narcotics: पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी रंगल्याचा प्रकार समोर आलाय. या ड्रग्ज प्रकरणावरुन राज्यातील राजकरण तापलंय. विरोधकांकडून सरकारला धारेवर धरलं जात आहे, तर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

Bharat Jadhav

पुण्याच्या शिवजीनगर भागातील एफसी रोडवरील एका नामांकीत हॉटेलमध्ये काल मध्यरात्री अल्पवयीन मुलं ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता त्यावरून राज्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली. धंगेकरांनी या प्रकरणावरुन पोलीस, उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत.

या प्रकरणामध्ये पूर्णपणे पोलिसांची चूक असून अंमली पदार्थ सर्रासपणे मिळत आहे. अंमली पदार्थ अशा हजारो हॉटेलमध्ये मिळताहेत. हुक्का पार्लरच्या नावाखाली पुणे शहरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ मिळतात. यात पोलिसांची चूक आहे. अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. पैसे घेतल्यामुळे असे धंदे चालतात. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे अधिकाऱ्याला पाठिशी घालून कोट्यवधी रुपये घेतात, हे धंदे चालतात. यातून मिळालेला पैसा राजकारणात वापरण्यात येतो. आमच्या तरुणाईला बरबाद करण्याचं काम हे लोकं करत आहेत. त्यामुळे ही सर्व चूक पोलीस आणि त्या खात्याचे मंत्री शंभूराज देसाईंची आहे, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय.

सुषमा अंधारे यांनीही या प्रकरणी सरकार आणि शंभूराजे देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. देसाई यांनी नैतिक जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिलीय. पुण्यातील व्हिडिओ पाहता राज्य उत्पादन शुल्क विभागाची अब्रु चव्हाट्यावर आली आहे. शंभूराज देसाई हे आता कोणावर अब्रु नुकसानीचा दावा करणार. देसाई यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा.

दरम्यान या प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही प्रतिक्रिया दिलीय. पुणे शहरात शिक्षणासाठी देशभरातून तसेच विदेशातून मोठ्या प्रमाणावर तरुण येतात.मोठ्या संख्येने विद्यार्थी येत असल्याने हा एक मोठी समस्या निर्माण झालीय. मध्यंतरी पुणे शहरात झालेल्या घटनेने सगळेच हादरले होते. कारवाईला सुरूवात झाली होती.आता अश्या पद्धतीने घटना घडल्यानंतर रात्री ११ अकरानंतर पब बंद केले जात आहे. आजची घटना ही खूपच गंभीर असून प्रशासन याची दखल घेणार आहे, असं यावेळी पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती सुरु; अर्ज कसा करावा?

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

SCROLL FOR NEXT