Pune- Nashik Highway Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: पुणे-नाशिक महामार्ग २२ तास रोखून धरला, रास्तारोको करणाऱ्या २५० जणांविरोधात गुन्हा

Pune- Nashik Highway: बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ आक्रमक झालेल्या नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरला होता. तब्बल २२ तास महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. आता या सर्व २५० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

Priya More

Summary -

  • शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामुळे संतप्त नागरिकांनी महामार्ग रोखला

  • तब्बल २२ तास पुणे–नाशिक महामार्गावर रास्तारोको करण्यात आला

  • मंचर पोलिसांनी २५० जणांवर गुन्हा दाखल केला

रोहिदास गाडगे, पुणे

पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्या नागरिकांवर हल्ले करत जीव घेत आहेत. शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे रोहन बोंबे या मुलाचा बिबट्याने जीव घेतला होता. बिबट्यांचे हल्ले रोखण्यात वन विभागाला यश येत नसल्याने आणि त्यांच्याकडून काहीच उपाययोजना केली जात नसल्यामुळे संतप्त झालेले नागरिक आक्रमक झाले होते. बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंचर येथे पुणे -नाशिक महामार्गावर रास्तारोको करण्यात आला होता. याप्रकरणी २५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे रोहन बोंबे या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ आणि बिबट मुक्त परिसर व्हावा या मागणीसाठी नागरिकांनी पुणे- नाशिक महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले होते. तब्बल २२ तास महामार्ग रोखून धरला होता. या आंदोलनावेळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

महामार्गावर रास्तारोको आंदोलन करणाऱ्या देवदत्त निकम, सुरेश भोर, अरुण गिरे यांच्यासह २५० जणांवर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बेकायदेशीर जमाव जमवणे, रास्तारोको करणे, सार्वजनिक कार्यात अडथळा निर्माण करणे अशा विविध कलमांतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरखेड आणि जांबुत परिसरात अवघ्या २० दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात ३ जणांचा जीव गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

SCROLL FOR NEXT