leopards file photos Pune Leopard Attack Video:
मुंबई/पुणे

Pune Leopard Attack Video: बिबट्या दबक्या पावलांनी आला अन् कुत्र्याचा फडशा पाडला; झटापटीचा सर्व थरार कॅमेरात कैद

Pune Leopard Attack Video: पुण्यात भर लोकवस्तीत बिबट्यानं कुत्र्याचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे.

रोहिदास गाडगे

Pune News: पुण्यात भर लोकवस्तीत बिबट्यानं कुत्र्याचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. रखवालदार म्हणून बसला अन् कधी शिकार झाली हे कुत्र्यालाही कळलं नाही. कुत्र्याला उचलून नेतानाचा क्षण बाजूला झोपलेल्या गॅरेज मालकाने हा क्षण जवळून पाहिला. या घटनेने परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

नगर कल्याण महामार्गावरील आळेफाटा येथील गॅरेजवर रखवालदार म्हणून कुत्रा बसला. त्याच ठिकाणी शेजारच्या बाजेवर मालक सुधाकर शर्मा हा गॅरेज मालक झोपले होते. तेवढ्यात शिकारीच्या हेतुने बिबट्या दबक्या पावलांनी आला आणि कुत्र्याच्या मानेला पकडून शिकार करुन प्रचंड वेगानं निघूनही गेला. यावेळी मालक मात्र पहाण्यापलीकडे काहीच करु शकला नाही. मात्र बिबट्याच्या शिकारीचा थरार त्याने डोळ्यांनी पाहिला...!

लोकवस्तीत बिबट्याने कुत्र्याची धाडसी शिकार केल्याने सर्वत्र दहशत पसरली आहे. तर दुसरीकडे दररोज बिबट्यांकडून कुत्र्यांची शिकारी होतेय. त्यामुळे कुत्र्यापासून होणारा रेबिजचा धोका बिबट्याला निर्माण होतोय का, याचंही निरिक्षण वनविभागाकडून व्हायला हवं. अन्यथा बिबट्याला रेबिज झालाच तर मोठा धोकाही निर्माण होऊ शकतो.

बिबट्याचे कुत्र्यांवरील हल्ल्यानंतर एक निरिक्षण समोर आले आहे. कुत्र्याच्या शिकारी नंतर बिबट्याला रेबिजचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कुत्र्यांमध्ये रेबिजचे निरोटॉपिक व्हायरस असल्यास धोका कमी आहे.

दरम्यान, बिबट्याला रेबिज झालाच्या घटना नसल्याने प्रतिबंधात्मक लस दिली जात नाही. कुत्र्यांचे लसीकरण,निरबीजीकरण करुन पैदास रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT