Smart Meter Installation  Saam TV
मुंबई/पुणे

Pune: परवानगीशिवाय स्मार्ट मीटर लावाल तर गाठ माझ्याशी... पुणेकर वकिलाचा वीज कंपन्यांना 'पुणेरी' स्टाईलने कडक इशारा

Smart Meter Installation: पुण्यामध्ये स्मार्ट मीटर लावण्यासंदर्भात एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगालचा व्हायरल होत आहे. परवानगीशिवाय स्मार्ट मीटर लावणाऱ्यांना ग्राहकाने पुणेरी स्टाईलमध्ये टोला लगावला.

Priya More
  • पुण्यात स्मार्ट मीटरवरून नवा वाद

  • वकिलाची ‘पुणेरी पाटी’ सोशल मीडियावर व्हायरल

  • स्मार्ट मीटर मोहिमेवर विरोधकांचा आक्षेप

  • न्यायालयानुसार स्मार्ट मीटर लावणे ऐच्छिक

अक्षय बडवे, पुणे

सध्या पुण्यात एम एस ई डी सी एल म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ने स्मार्ट मीटर बसवण्याबाबत ग्राहकांना एसएमएस द्वारे किंवा अन्य माध्यमांद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचा वातावरण आहे. विरोधकांनी सुद्धा याबाबत आवाज उठवत अनेक वेळा आंदोलन सुद्धा केली आहेत. असंच आता या धोरणाविरोधात एका पुणेकराने संबंधित विभागाला चक्क वीज मीटरच्या खाली पुणेरी पाटी लावत आव्हान दिलं आहे.

पुण्यातील एका वकिलाने वीज मीटर खाली पांढरा रंगाचा कागद चितकवला असून त्यावर "स्मार्ट मीटर परवानगीशिवाय लावू नये अन्यथा घोडा लावण्यात येईल" असा मजकूर लिहला आहे. पुण्यातील कोणत्या भागात या व्यक्ती ने ही पाटी लावली आहे हे समजू शकलेले नाही. सध्या ही पुणेरी पाटी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

राज्यात सध्या स्मार्ट मीटरची जोरदार चर्चा आहे. स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेवरून वाद निर्माण झाला आहे. या संदर्भात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने महत्वपूर्ण स्पष्टीकरण देत स्मार्ट मीटर बसविणे ग्राहकांसाठी बंधनकारक नसून ऐच्छिक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरात बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यात महावितरणाकडून आतापर्यंत १ कोटी २० लाख स्मार्ट मीटर बसविण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. स्मार्ट मीटरमुळे अचूक रिडिंग होते. राज्यात स्मार्ट मीटरचे प्रमाण वाढल्यानंतर ग्राहकांच्या वीजबिलाच्या तक्रारी खूप कमी झाल्या असल्याचे सांगितले जात आहे. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर संबंधित ग्राहकाला मोबाईल ॲपद्वारे दर तासाला ते किती वीज वापर करतात याची माहिती मोबाईलवर समजू शकते. त्यामुळे वीजबिलाबाबत पारदर्शिता राहते.

स्मार्ट मीटरमुळे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे ग्राहकाला त्याच्या वीज वापरावर आणि वीजबिलावर नियंत्रण ठेवणे देखील शक्य झाले आहे. स्मार्ट मीटरच्या ॲपद्वारे ग्राहकांना त्यांच्या घरामध्ये अथवा कार्यालयामध्ये काही समस्या असल्यास ते लगेच समजते. मुळात या स्मार्ट मीटरचा ग्राहकांना फायदा होत आहे. ग्राहकाने कोणत्या वेळेला किती वीज वापरली हे स्मार्ट मीटरमुळे लगेच कळते. त्यामुळे ते आपल्याला महिन्याला किती वीज लागते यांचा अंदाज लावून पुढच्या महिन्यात कसा वीजाचे वापर करायचा याचे नियोजन करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरात अनेक भागात सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट सह पाऊस

EPF मध्ये नॉमिनी बदलायचा कसा? सोप्या स्टेप्सनं घ्या समजून

Nagpur Crime: नागपूर हादरले! पैशाच्या वाटणीवरून वाद, कुख्यात गुंडाची गळा चिरून हत्या

देव तारी त्याला कोण मारी! १० महिन्यांच्या चिमुरड्यासह १८ प्रवाशांना जीवदान कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर बस उलटली

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती पैसे मिळाले? घरबसल्या काही मिनिटांत करा तपास

SCROLL FOR NEXT