Lavasa House landslide : Saam tv
मुंबई/पुणे

Lavasa House landslide : लवासातील बेपत्ता कामगारांचा अद्याप शोध सुरूच; मदत कार्यात अडथळे, घटनास्थळी परिस्थिती काय?

Lavasa house landslide update : लवासातील बेपत्ता कामगारांचा अद्याप शोध सुरूच आहे. कामगारांना शोधण्याच्या मतद कार्यात अडथळे येत आहेत. घटनास्थळी परिस्थिती काय? वाचा सविस्तर

Vishal Gangurde

सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी

लवासा : पुण्यातील मुळशी तालुक्यातील लवासा येथील कोसळलेल्या व्हिलामध्ये अडकून पडलेल्या दोन कामागारांचा अद्याप शोध लागलेला नाही. कालपासून येथील व्हिला भोवतालची माती आणि राडारोडा काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र, या बेपत्ता कामगारांचा शोध घेताना विविध कारणांनी मदत कार्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे तेथील २ कामगार अद्यापही बेपत्ता आहेत.

कोसळलेल्या व्हिलामध्ये दोन कामगार अडकून पडले आहेत. राहुल घोरेचा (४२) आणि मनोज चुडासामा (६३) अशी बेपत्ता कामगारांची नावे आहेत. दोन्ही कामगार मुंबईच्या दहिसरमधील रहिवासी आहेत. दोन्ही कामगार इलेक्ट्रीशियनची कामे करण्यासाठी लवासात आले होते.

या दोन्ही कामगारांचे व्हिलामध्ये इलेक्ट्रीकची कामे सुरू होती. व्हिला कोसळल्यानतंर दोन्हीही कामगार बेपत्ता झालेले आहेत. दोघे कामगार कोसळलेल्या व्हिलाच्या मातीमध्ये दोघे अडकून पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरडीची माती आणि राडारोडा दूर करून या दोघांचा शोध घेण्याचे काम चालू आहे. घटनास्थळी सध्या जेसीबी आणि अन्य साधने आहेत. मातीचे प्रामण खूपच आहे. त्यामुळे माती तसेच अन्य राडारोडा बाजूला करायला मदतनिसांची दमछाक होत आहे. कालपासून सुरू केलेले मदत कार्य अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही. लवासा भागात अद्यापही पावसाची जोरदार हजेरी चालूच आहे. त्यामुळे माती दूर करण्यासाठी गेलेल्या व्यक्ती तेथील मातीत अडकून पडत आहेत.

लवासात जाण्यासाठी दोनच मुख्य व रस्ते सुलभ आहेत. त्यापैकी एक रस्ता पानशेत मार्गे वरसगाव - आडमाळ आणि लवासा असा आहे. तर दुसरा रस्ता पिरंगुट - मुठा - टेमघर असा आहे. सध्या टेमघरमधील रस्ता खचल्याने बंद ठेवला आहे.

पानशेतमार्गे असलेला रस्ता पडळघर या ठिकाणी कालच्या पावसात पूर्ण वाहून गेलाय. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी माती व राडारोडा बाजूला करण्यात येत आहे. मात्र या कामात जेसीबीही अपुरी पडत आहेत. या ठिकाणी पोकलेनची अत्यंत गरज आहे.

सध्या दोन्हीही रस्ते बंद असल्याने तेथे पोकलेन जाऊच शकत नाही. त्यामुळे मदत कार्यात अडथळा झाला आहे. या संकटामुळे प्रशासनापुढे मोठेच संकट उभे राहिलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT