उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेसचा मोठा घातपात टळल्याची घटना घडली. उदयपूर-जयपूरमधील घटनेनंतर आता पिंपरी चिंचवड शहरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. चिंचवड ते आकुर्डीदरम्यान रेल्वे ट्रॅकवर अज्ञात समाजकंटकांनी रुळांवर मोठं-मोठे दगड रचल्याचे समोर आले आहे. या समाजकंटकांनी रेल्वे गाडीला अपघात करण्याचा डाव रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधनाने सुदैवाने उधळला आहे. (Latest Marathi News)
पुणे विभागातील रेल्वे प्रशासनाने काही समाजकंटकांनी रेल्वे रुळांवर लावलेले मोठे अडथळे वेळीच हटवल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. चिंचवड-आकुर्डी विभागात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी या या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. रेल्वे अधिकारी म्हणाले , 'मोठं-मोठे दगड हे अप लाईन ट्रॅकवर टाकण्यात आले होते. 'रेल्वे विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे रेल्वे कर्मचारी या विभागात रुटीन ट्रॅक मेंटेनन्स वेल्ड टेस्टिंग कामासाठी गेले होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी चिंचवड ते आकुर्डी दरम्यान UP लाईन ट्रॅकवर मोठे दगड ठेवल्याचे आढळले.
'कर्मचार्यांनी या गैरप्रकाराचा वेळीच शोध घेतल्याने मोठा घातपात टळला आहे. रेल्वे ट्रॅक वर आरपीएफ आणि जीआरपीकडून पुढील तपास सुरू आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.