Pune Police
Pune Police Saam Tv
मुंबई/पुणे

महिला आमदारांना फसवणारे बंटी-बबली अडकले; दोघेही MPSCची करत होते तयारी

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

पुणे: काही दिवसांपूर्वी राज्यातील ४ महिला आमदारांची फसवणूक झाल्याची घटना पुण्यात (Pune)उघडकीस आली होती. या प्रकरणी पुण्यातील पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी आज ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पुण्यातील भाजप (BJP)आमदार माधुरी मिसाळ,आमदार श्वेता महाले, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी आधी महिला आमदारांनी सायबरला तक्रार दिली होती, मात्र त्यानंतर पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग केला. त्यानंतर पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये एका अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आमदार माधुरी मिसाळ यांना फोन करून मुकेश राठोड असे नाव सांगून त्याची आई बाणेर येथील हॉस्पिटलमध्ये (Hospital) ऍडमिट असून, तिच्या औषध उपचाराकरिता पैशाची गरज आहे, असे सांगून तिच्या औषध उपचाराकरता ३ हजार ४०० रुपये गुगल पे नंबर देऊन त्यावर पाठवण्यास सांगितले होते.

माधुरी मिसाळ या मुंबई येथे कामानिमित्त गेल्या होत्या. यावेळी त्यांचे सहकारी आमदार देवयानी फरांदे, मेघनाताई साकोरे, मेघना बोर्डीकर, श्वेताताई महाले यांनी त्यांनासुद्धा आरोपी मुकेश राठोड याने फोन करून अशाच प्रकारचे कारण सांगून पैशाची मागणी केली असल्याचे समोर आले. यावेळी त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर बिबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

आरोपी मुकेश राठोड हा बुलढाणा जिल्ह्यातील आहे. त्याचे शिक्षण बी. ए. झाले आहे. तर त्याने ज्या गुगल पे नंबरचा वापर केला त्या सुनीता कल्याण क्षीरसागर अस त्या नंबर धारकाचे नाव आहे. सुनीता ही बीएस्सी झाली असून, ती औरंगाबादची राहणारी आहे. हे दोघेही या गुन्हातील आरोपी आहेत. हे दोघेही एमपीएससीचे विद्यार्थी आहेत. या दोघांनाही खर्चासाठी पैसे हवे होते. म्हणून या दोघांनी मिळून या चार आमदारांना खोटं सांगून पैसे घेतले.

वैद्यकीय कारणाचे कारण सांगितल्यावर पैसे मिळतात म्हणून त्यांनी हे कारण सांगितले होते. वैद्यकीय कारणासाठी आमदार मदत करतात ही माहिती दोघांना होती. या दोघांनाही औरंगाबादहून ताब्यात घेतले आहे. हे दोघे शेतकरी कुटुंबातील असून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. या दोघांनी अजून कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास बिबवेवाडी पोलीस (Police) करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

EVM बिघाड, राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ आणि आरोपांच्या फैरी; तिसऱ्या टप्प्यात कुठं काय घडलं?

SCROLL FOR NEXT