Pune crime News  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरुच; मध्यरात्री घरांवर हल्ला, दरवाजांची तोडफोड

Pune crime : पुण्यात कोयता गँगने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. या गँगच्या तिघांनी मध्यरात्री काही घरांवर हल्ला केला. तसेच घरांच्या दरवाजांची तोडफोड केली.

Vishal Gangurde

सचिन जाधव, साम टीव्ही

Pune News : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरु असल्याचं दिसून येत आहे. पुण्यात कोयता गँगने शुक्रवारी मध्यरात्री कोयते हातात घेत अनेक घरांवर टोळक्याकडून हल्ला केला आहे. या गुंडांनी अनेक घरांवर हल्ला करत दरवाजांची तोडफोड केली आहे. पुण्यातील वानवडी भागात ही धक्कादायक घटना घडली. वानवडीमधील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात गेल्या काही वर्षांपासून कोयता गँगचा नंगानाच सुरु आहे. पुण्यातील या गँगने पुन्हा एकदा शहरात धुमाकूळ घालायला सुरुवात केल्याचं चित्र दिसत आहे. आहे. पुण्यातील वानवडी परिसरात कोयता गँगमधील गुंडांनी कोयता हातात घेऊन अनेक घरावर हल्ले केले. कोयता गँगमधील गुंडांनी अनेक घरांच्या दरवाजांची तोडफोड केली.

पुण्यातील वानवडी भागात असणाऱ्या महादजी शिंदे शाळा परिसरात मध्यरात्री अज्ञातांकडून कोयते हातात घेत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या गुंडांकडून अनेक घरांच्या दरवाजांची तोडफोड करण्यात आली आहे. सीसीटीव्हीमुळे गुंडांनी चेहरे झाकून घरांच्या दरवाजांची तोडफोड केली. या घटनेने वानवडी परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेने गुंडाचा शोध सुरु केला आहे.

कायदा सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर

पुण्यात गेल्या काही वर्षांपासून कोयता गँगकडून परिसरात दहशत पसरवणे सुरुच आहे. गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील कोयत्या गँगची गुन्हेगारी वाढली आहे. कोयता गँगची गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाईचा सपाटा लावलाय. मात्र, तरीही शहरात कोयता गँगचा धुमाकूळ सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. कोयता गँगच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरात एकच दहशत पसरली आहे. या कोयता गँगमुळे शहरातील कायदा सुवव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सिडको विभागाचा भोंगळ कारभार उघड

History Of Hello: फोनवर 'हॅलो' आपण का बोलतो? इतिहास ऐकून थक्क व्हाल

Nanded : स्मशानभूमीच्या जागेवरून गावकरी आपापसात भिडले; गायरान जमिनीवर अंत्यविधी करण्यास विरोध

Dugarwadi Waterfall: एका दिवसात धबधब्यावर जाऊन भिजायचंय? मग नाशिकजवळचा 'हा' धबधबा ठरेल परफेक्ट

जनसुरक्षा विधेयकावरून वातावरण तापलं; संभाजी ब्रिगेडचं मंत्रालयात घुसून आंदोलन|VIDEO

SCROLL FOR NEXT