Pune Koyta Gang
Pune Koyta Gang Saam tv
मुंबई/पुणे

Pune Koyta Gang: पुण्यात कोयता गँगचा हैदोस सुरू; टोळक्याकडून वाहनांची तोडफोड, नागरिकांमध्ये दहशत

Vishal Gangurde

अक्षय बडवे

Pune Crime News: पुण्यात कोयता गँगचा हैदौस सुरूच आहे. पुण्यात वाहनांची तोडफोड करण्याचे सत्र सुरू असल्याचे एका घटनेतून समोर आले आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात वाहनांची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. वाहनांच्या तोडफोडीच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील शिवाजीनगर परिसरात असणाऱ्या वडारवाडीमध्ये टोळक्याकडून वाहनांची तोडफोड झाल्याची घटना घडली. या टोळक्याने हातात लोखंडी रॉड आणि कोयते घेऊन दहशत माजवली आहे. शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात टोळक्याने वैमनस्यातून कोयते उगारुन दहशत माजवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

टोळक्याने दुचाकी, रिक्षा आणि मोटारीची तोडफोड केली. टोळक्याने दुचाकी, रिक्षा आणि मोटारीची तोडफोड केली. या प्रकरणी पाच ते सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रवि ओरसे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नेमकं काय घडलं?

ओरसे हे वडारवाडी भागातील गोलंदाज चौकात थांबले होते. त्या वेळी पाच ते सहा जण तेथे आले. त्यांच्याकडे दांडके आणि कोयते होते. टोळक्याने परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करुन दहशत माजविली.

ओरसे यांच्या मोटारीची काच फोडली. टोळक्यांनी रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या रिक्षा दुचाकींची तोडफोड करुन आरोपी पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पुण्यात अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांकडून अत्याचार

पुण्यातून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांकडून सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तसेच अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पीडित मुलीने हा प्रकार शिक्षकांना सांगितल्यानंतर उघडकीस आला. पीडिता १६ वर्षीय असून तिने पोलिसांत या घटनेबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून कोंढवा (Kondhava) पोलीस ठाण्यात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (पॉस्को) कायद्यांतर्गत तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

Nashik News: सासरच्या छळाला कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल, 2 मुलांसह संपवलं जीवन

Weekly Horoscope: उद्यापासून सुरू होणार या 5 राशींचे अच्छे दिन, पुढील 7 दिवस जीवनात राहणार आनंद

Today's Marathi News Live: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची दोन मुलांसह शेततळ्यात आत्महत्या

Bhiwandi Fire: भिवंडीत प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग

SCROLL FOR NEXT