Pune Police Attack Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Police Attack : पुण्यात कोयता गँगची वाढली हिंमत, थेट पोलीस अधिकाऱ्यावरच केला हल्ला

Pune Koyta gang News: पुण्यात गुंडांची मजल इतकी वाढली आहे की, ते थेट आता पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करत आहेत. अशीच एक घटना रामटेकडी परिसरात घडल्याचं समोर आलं आहे.

Satish Kengar

अक्षय बडवे, साम टीव्ही, पुणे प्रतिनिधी

पुणे शहरात कोयता गँगची हिंमत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पुण्यात गुंडांची मजल इतकी वाढली आहे की, ते थेट आता पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करत आहेत. अशीच एक घटना रामटेकडी परिसरात घडल्याचं समोर आलं आहे.

रामटेकडी परिसरात भांडण सोडवायला गेलेल्या अधिकाऱ्यावर टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात वानवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. रत्नदीप गायकवाड, असे हल्ल्यात जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील रामटेकडी परिसरात टोळक्यात भांडणं सुरु होती. यावेळी पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले होते. गायकवाड हे एका टोळीत असलेल्या तरुणाला पकडण्यासाठी तेथे गेले होते.

याचवेळी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात रत्नदीप गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दोन तरुणांवर दहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने केला हल्ला

दरम्यान, याच महिन्यात दोन तरुणांवर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याचं समोर आलं होतं. ही घटना वडगाव शेरी भागातील सत्यम सेरेनिटीमध्ये घडली होती. हे दोन तरुण त्यांच्या चार ते पाच मित्रासोबत गप्पा मारत बसले होते. अचानकपणे चार ते पाच मोटरसायकल वरून आठ ते 10 जणं त्याठिकाणी आले आणि त्यांनी या तरुणांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. यानंतर टोळक्याने तृणनावर कोट्याने हल्ला केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BEML Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरती; पात्रता काय? वाचा सविस्तर

१३ नोव्हेंबरपर्यंत टोलनाका हटवा, नाहीतर उखडून टाकू; प्रताप सरनाईकांचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update: बारामतीत नगराध्यक्षपदासाठी ओबीसी चेहऱ्याला प्राधान्य द्यावे; सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची भावना

Pune Land Scam: पुणे येथील जमीन घोटाळा प्रकरणावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया|VIDEO

भयंकर! मुंबईतील प्रसिद्ध रूग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला; तिघे गंभीर जखमी, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT