Nilesh Ghaywal Saam Tv
मुंबई/पुणे

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचे पंख छाटण्यास सुरूवात, टोळीतील विश्वासू जोडीदाराच्या मुसक्या आवळल्या

Pune Nilesh Ghaywal News : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील अजय सरोदे याला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. त्याने परवानाधारक पिस्तुलाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करून २०० राऊंड फायर केल्याचा उलगडा झाला आहे. पोलीस शस्त्र परवाना प्रक्रियेची सखोल चौकशी करत आहेत.

Alisha Khedekar

  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळच्या टोळीतील सदस्याला बेड्या

  • अजय सरोदेच्या परवानाधारक पिस्तुलातून २०० राऊंड फायर

  • लोणावळा व सोनई येथे गोळीबाराचा सराव उघड

  • शस्त्र परवाना प्रक्रिया तपासणीखाली

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) टोळीतील सदस्य अजय सरोदे (ajay sarvode) याला कोथरूड पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडे असलेल्या परवानाधारक पिस्तुलातून त्याने दोनशे राऊंड फायर केल्याचे समोर आले आहेत. लोणावळा येथील फॉर्म हाऊस आणि सोनइ या गावातील शेतामध्ये त्याने सराव म्हणून हे राऊंड फायर केल्याचे समोर आले असून त्यादृष्टीने कोथरूड पोलीस तपास करीत आहेत. अजय सरोदे असे अटक केलेल्याचे नाव आहे.

तीन महिन्यांपूर्वी कोथरूडमध्ये घायवळ टोळीतील सदस्यांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला होता. त्या घटनेनंतर काही मिनिटांतच टोळक्याने रस्त्यावर थांबलेल्या दुसऱ्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. या मारहाण प्रकरणांत अजय सरोदे सहभागी होता, अशी माहिती तपासात समोर आली. या घटनांनंतर सरोदे फरार झाला होता.

कोथरूड पोलिसांनी काही दिवसांच्या पाठपुराव्यानंतर त्याला अटक केली. चौकशीदरम्यान सरोदे याच्याकडे परवानाधारक पिस्तुल असल्याचे उघड झाले. जानेवारी २०२४ मध्ये त्याला शस्त्राचा परवाना देण्यात आला होता. परवाना मिळाल्यानंतर त्याने तब्बल ४०० काडतुसे खरेदी केली, त्यापैकी २०० काडतुसे फायर केल्याचे समोर आले आहे.

सरोदेनं लोणावळ्यातील एका फॉर्म हाऊसवर आणि सोनई गावातील शेतामध्ये पिस्तुलातून गोळीबाराचा सराव केल्याची माहिती पोलिस तपासात मिळाली. परवानाधारक शस्त्र असूनही त्याचा अनधिकृत सराव आणि मोठ्या प्रमाणावर काडतुसांचा वापर यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे विशेष चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून संबंधिताला शस्त्र परवाना देताना दिलेल्या दस्तऐवजांची व इतर कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: सिंहगड उड्डाणपूल ६६ ठिकाणी फोडणार, पुण्यातील वाहतूक कोंडी वाढणार; नेमका फटका कुणाला बसणार?

Maharashtra Live News Update: शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्व हरपले- अजित पवार

धक्कादायक!'२१ वर्षांपर्यंत थांब' म्हणताच १९ वर्षीय प्रियकराने संपवलं आयुष्य, महाराष्ट्राला हादरवणारी घटना

Jay Pawar Wedding: अजितदादांच्या घरी लगीनघाई! लेक जय पवारांचं लग्न परदेशात होणार; कसा असणार विवाहसोहळा? पत्रिका पाहा

Rapper Death: प्रसिद्ध रॅपरचे निधन, वयाच्या २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, संगीत विश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT