Kothrud Gets Free Metro Shuttle Saam
मुंबई/पुणे

Pune: घर ते मेट्रो स्थानक प्रवास होणार मोफत; शटल बससेवा सुरू, थांबे अन् कोणत्या वेळेत धावणार?

Kothrud Gets Free Metro Shuttle: मेट्रो स्थानक ते घर प्रवास अधिक सोपा व्हावा आणि खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा या उद्देशाने शटल बससेवा सुरू करण्यात आली.

Bhagyashree Kamble

  • कोथरूडमध्ये मेट्रो स्थानक ते घर मोफत शटल बससेवा सुरू.

  • मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला.

  • सोमवार ते शनिवार सकाळ-संध्याकाळ ठराविक वेळेत बससेवा उपलब्ध.

  • नागरिकांना आरामदायी प्रवास आणि सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळणार.

आता पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. कारण कोथरूडमध्ये मेट्रो स्थानक ते घर प्रवास करणाऱ्यांना मोफत बससेवेचा लाभ मिळणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कोथरूडमध्ये मोफत शटल बससेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना नक्कीच याचा फायदा होईल.

मेट्रो स्थानक ते घर हा प्रवास अधिक सुखकर व्हावा आणि सार्वजनिक वाहतुकीचा प्रसार व्हावा, या उद्देशानं मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारानं नवीन शटल बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही बससेवा कोथरूडमध्ये सुरू कऱण्यात आली आहे. या बससेवेचे लोकार्पण चंद्रकांत पाटील आणि पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सोमवार ते शनिवार ही सेवा सुरू राहणार असून, नागरिकांच्या मागणीनुसार बसचे थांबे निश्चित करण्यात आले आहे. या सेवेमुळे कोथरूडकरांना आधुनिक, सुरक्षित आणि आरामदायी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होईल, असं पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे वेळ आणि पैशांमध्ये बचत होऊ लागली. घरापासून मेट्रोस्थानकापर्यंत ये-जा करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेकजण या सुविधेकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे मेट्रोचा वापर अधिकाधिक व्हावा, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य मिळावे आणि खासगी वाहने रस्त्यावर येऊ नये आणि वाहतूक कोंडी होऊ नये या उद्देशाने चंद्रकांत पाटील यांनी लोकसहभागातून मोफत शटल बससेवा सुरू केली आहे.

अशी असेल मोफत शटल बससेवा

राजाराम पूल-माळवे चौक, वनदेवी- कर्वेनगर, डहाणूकर- कर्वे पुतळा- करिश्मा चौक- एसएनडीटी मार्गावर रोज सकाळी ८.३० ते १ आणि सायंकाळी ४ ते ८ वेळेत सुरु असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पासवर्ड न टाकता WiFi करा कनेक्ट, ही आहे एकदम सोपी ट्रिक्स

Bigg Boss 19-Pranit More : प्रणित मोरे 'बिग बॉस १९' का जिंकला नाही? 'ही' आहेत कारणे

Maharashtra Live News Update: विरोधी पक्षनेतेपदाबाबत अफवा, अफवांवर विश्वास ठेवू नका - आदित्य ठाकरे

जनावरांच्या गोठ्यात चिमुकलीवर बलात्कार; नंतर नराधमानं धार्मिक स्थळाजवळ आयुष्य संपवलं

Black Spots Onion: काळे डाग अन् बुरशी लागलेला कांदा खावा का? आरोग्यासाठी किती घातक? जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT