kondhwa-based tuition teacher booked for hitting 10-year-old student with belt and notebooks over homework issue. AI image
मुंबई/पुणे

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Pune Tuition Teacher Booked : कोंढव्यातील ट्युशनमध्ये १० वर्षीय मुलाला शिक्षिकेने बेल्ट आणि वह्यांनी मारहाण केली. गंभीर दुखापतीनंतर शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

पुण्यातील कोंढवा भागात मुलाला ट्युशनदरम्यान शिक्षिकेने मारहाण केली

मुलाला बेल्ट आणि वह्यांनी मारहाण करून डोक्याला व छातीला दुखापत करण्यात आली.

मुलाच्या आईने वैद्यकीय अहवालासह तक्रार दिल्यानंतर शिक्षिकेवर गुन्हा दाखल.

कोंढवा पोलीस पुढील तपास करत असून शिक्षिकेविरोधात जाणीवपूर्वक दुखापतीचा गुन्हा दाखल.

Pune crime News : खासगी ट्युशनमध्ये १० वर्षांच्या मुलाला बेल्ट अन् वह्यांनी मारहाण केल्या प्रकरणी शिक्षिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कोंढव्यातून हा प्रकार समोर आला आहे. बुधवारी सायंकाळी कोंढव्यात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने घरात ट्युशनवेळी १० वर्षाच्या मुलाला मारहाण केली. शिक्षिकेन मुलाला बेल्ट आणि वह्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये चिमुकल्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाल्याचा दावा केला आहे. १० वर्षाच्या मुलाच्या ३३ वर्षीय आईने शुक्रवारी याबाबतची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा आणि शिक्षिका एकाच एरियात राहतात.

कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. पाटणकर यांनी याबाबत सांगितले की, आरोपी महिला कोंढव्यातील एका सोसायटीतील तिच्या फ्लॅटमध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ट्युशन घेते. त्या महिलेविरोधात तक्रार करणारी महिला आणि मुलगा जवळच राहतात. गेल्या काही दिवसांपासून मुलगा ट्युशनसाठी जात नव्हता. ही शिक्षिका सर्व विषय शिकवते.

पोलिसांच्या तपासात असे दिसून आले की, १० वर्षांच्या मुलाने गृहपाठ केला नव्हता. त्याने शिक्षिकेला वह्या दाखवल्या नाहीत. अभ्यास केला नाही अन् वह्याही दाखवल्या नाहीत, म्हणून शिक्षिका संतापली होती. त्या शिक्षिकेने मुलाला शिविगाळ केली अन् बेल्ट-वह्यांनी मारहाण केली. या मारहाणीमुळे मुलाला दुखापत झाली असून त्याला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले, असे तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

रूग्णालयात मुलावर प्राथमिक उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले. आईने सदर वैद्यकीय कागदपत्राच्या आधारावर शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, असे पाटणकर यांनी संगितले. पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या (BNS) संबंधित कलमांखाली जाणीवपूर्वक दुखापत करण्याशी संबंधित गुन्हा दाखल केला आहे. कोंडवा पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

Chronic Kidney Symptoms: क्रॉनिक किडनी डिजीजची सुरुवात कशी होते? महिलांनी अजिबात दुर्लक्षित करु नका

Maharashtra Live News Update: सतिश उर्फ खोक्याला जामीन मंजूर

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ; १५ गावांना सतर्कतेचा इशारा | VIDEO

SCROLL FOR NEXT