Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Terror Alert : पुण्यात मध्यरात्री ATS कडून २५ ठिकाणी छापेमारी, दहशतवादी नेटवर्क सक्रिय? अनेक संशयित ताब्यात

Pune News : पुण्यातील कोंढवा परिसरात ‘I Love मोहम्मद’ अशी पोस्टर लागल्याने संशय निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर एटीएस आणि पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत १८ संशयितांचा शोध घेतला आहे.

Alisha Khedekar

  • कोंढवा परिसरात ‘I Love मोहम्मद’ पोस्टर लागल्याने खळबळ उडाली आहे

  • एटीएस आणि पोलिसांनी पहाटेपर्यंत गुप्त मोहीम राबवली

  • तब्बल १८ संशयितांचा शोध घेण्यात आला असून काहींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली

  • २०२३ मधील ISIS संशयित प्रकरणाशी संबंध तपासात उघड

पुण्यात पुन्हा एकदा दहशतवादी असल्याच्या संशयाने खळबळ उडाली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात आय लव मोहम्मदचे पोस्टर लागले आहेत. ही चळवळ या ठिकाणाहून चालवली जाण्याची एटीएसला संशय आहे. या पोस्टरने परिसरातले वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीपासून राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त पथकाने शहरातील काही ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले. या कारवाईत तब्बल १८ संशयित व्यक्तींचा शोध घेतला असून, काहींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ही कारवाई रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत गुप्तपणे चालू होती, ज्यामुळे शहरासह राज्यात चिंतेचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही मोहीम संशयितांच्या दहशतवादी नेटवर्कशी संबंधित असण्याची शक्यता आहे. "कोंढवा परिसरात संशयितांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले होते. दोन वर्षांपूर्वीच्या कोंढवा भागात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. त्या तिघांच्या माध्यमातून देशव्यापी संभाव्य दहशतवादी कट उधळण्यात आला होता. आता पुन्हा त्याच भागात संशयितांचे जाळे सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरात दोन वर्षांपूर्वी (२०२३ मध्ये) पोलिसांनी इथे ISISशी संबंधित तीन संशयितांना अटक केली होती. त्या प्रकरणात बॉम्ब तयार करण्याचे साहित्य, ड्रोन मटेरिअल आणि इतर संशयास्पद वस्तू सापडल्या होत्या. त्या संशयितांनी पश्चिम घाटातील जंगलात बॉम्ब चाचण्या घेतल्याचा आरोप होता. या घटनेनंतर कोंढवा परिसरावर तपास यंत्रणांचे विशेष लक्ष केंद्रित झाले.

याशिवाय, २०२४ मध्ये एटीएसने इथे बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजचा भंडाफोड करून ३,७८८ सिमकार्डे जप्त केली होती. त्या प्रकरणातही दहशतवादी संवादासाठी वापरल्या जाणाऱ्या नेटवर्कचा संशय होता. कोंढवा परिसरातील घनदाट वस्ती आणि मजूर वस्त्या यामुळे संशयितांना लपण्यास सोयीचे ठरतात. या भागात बांगलादेशी घुसखोर आणि इतर संशयितांचे जाळे सक्रिय असल्याची माहिती पूर्वीच समोर आली होती.

दरम्यान मध्यरात्री १२ नंतर सुरू झालेली ही मोहीम पहाटे ५ वाजेपर्यंत चालू होती. कोंढवा काही ठिकाणी छापे टाकण्यात आले. यावेळी १८ संशयितांचा शोध घेण्यात आला यापैकी काहींना ताब्यात घेतले. कारवाईपूर्वी मोठी गुप्तता बाळगण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुकांचा पडघम वाजला! ‘या’ तारखेला मतदान, अवघ्या काही तासांत निकाल; अर्ज भरण्याची अंतिम तारीख काय? जाणून घ्या एका क्लिकवर|VIDEO

बिगुल वाजलं! महापालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू, नामनिर्देशनाबाबत आयोगाची मोठी माहिती

Municipal Elections: मुंबई -पुणे, नागपूर ते कोल्हापूर, कोणकोणत्या २९ महापालिकांच्या निवडणुका होणार? पाहा संपूर्ण यादी

Maharashtra Live News Update: 16 जानेवारीला महापालिका निवडणुकांचा निकाल

Beauty Tips : रिका वॅक्स नक्की काय आहे? जाणून घ्या त्याचे फायदे, महिलांनी एकदा करुनच बघा

SCROLL FOR NEXT