Kirit Somaiya : सोमय्या यांच्यावर संचेतीमध्ये उपचार सुरु; शिवसैनिकांनी केली होती मारहाण SaamTvNews
मुंबई/पुणे

Kirit Somaiya : सोमय्या यांच्यावर संचेतीमध्ये उपचार सुरु; शिवसैनिकांनी केली होती मारहाण

झटापटीत सोमय्या महापालिकेच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर खाली पडले. यावेळी शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केली.

गोपाल मोटघरे

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांच्या पुणे दौऱ्यात जोरदार राडा झाला. सोमय्या यांनी मोठा गौप्यस्फोट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आज सकाळी गंभीर आरोप केले होते. संजय राऊत (Sanjay Raut) भागिदार असलेल्या व अस्तित्वात नसलेल्या लाईफ लाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस कंपनी या कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट देऊन तब्बल शंभर कोटींचा जम्बो कोविड घोटाळा करण्यात आल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला. त्यांनतर प्रचंड गदारोळ झाल्याचे आज सकाळपासूनच पाहायला मिळाला. (Kirit Somaiya Latest News)

जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत किरीट सोमय्या हे पुणे (Pune) महानगरपालिकेत पत्रकार परिषद घेण्यासाठी आले असताना त्या ठिकाणी जमलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला व सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी झालेल्या झटापटीत सोमय्या महापालिकेच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर खाली पडले. यावेळी शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात किरीट सोमय्या हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

महापालिकेतून पत्रकार परिषद आटोपल्यावर किरीट सोमय्या हे पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये लाईफ लाईन हॉस्पिटल चे संचालक सुजित पाटकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी जाणार होते. मात्र, तत्पूर्वीच हा सगळा राडा झाला. महापालिकेच्या आवारातील घडामोडीनंतर सोमय्या तेथून आपला ताफा घेऊन बाहेर पडू लागले असतानाच पुन्हा शिवसैनिकांनी सोमय्या यांची गाडी अडविण्यासाठी त्यांच्या गाडीसमोर लोटांगण घातले. तर काही शिवसैनिकांनी आपल्या हाताच्या बुक्क्यांनी सोमय्या यांच्या कार वर जोरदार ठोसे देखील मारले. यावेळी किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेत तैनात असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी देखील शिवसैनिकांना पांगवण्यासाठी सौम्य असा लाठीचार्ज केला. सोमय्या यांना मारहाण झाल्याचे वृत्त त्यांनतर वाऱ्यासारखे पसरले.

लाईफ लाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस कंपनीचे सुजित पाटकर यांच्या विरोधात तक्रार दाखल

दरम्यान, शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये लाईफ लाईन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस कंपनीचे संचालक सुजित पाटकर यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. सुजित पाटकर यांच्या लाईफ लाइन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस कंपनी या अस्तित्वात नसणाऱ्या कंपनीला एक हजार बेडचे कोविड हॉस्पिटल चालवण्याचा अनुभव नसताना देखील, पीएमआरडीए ने पुण्यातील जम्बो कोविड सेंटर पाटकर यांच्या लाईफ लाईन कंपनीला चालविण्यास दिले होते. या सर्व प्रक्रियेत १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत सदर कंपनीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत भागीदार असल्याचा आरोप देखील सोमय्या यांनी केला होता. यावरून मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला होता.

सुजित पाटकर यांना पुण्यातील जम्बो कोविड सेंटर चालविता न आल्यामुळे फक्त दहा दिवसात पीएमआरडीए ने पाटकर यांच्या लाईफ लाईन कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्याचा दावा देखील किरीट सोमय्या यांनी केला. सुजित पाटकर हे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जवळचे असल्याने त्यांना पुण्यातील पीएमआरडीए चा जम्बो कोविड सेटर चालविण्यास मिळाल्याचे सोमय्या यांचे म्हणणे आहे. खोटी कागदपत्रे देऊन सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल ला जम्बो सेंटर चालविण्यास मिळाले असा आरोप सोमय्या यांनी केला.

तसेच अशाच प्रकारची खोटी कागदपत्रे देऊन सुजित पाटकर यांनी मुंबईतील चार इतर कोविड सेंटरच कॉन्ट्रॅक्ट मिळवलं, त्यात दहिसर, मुलुंड, वरळी आणि एनएससीआय महालक्ष्मी रेसकोर्सच्या जम्बो कोविड सेंटरचा समावेश असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल ला पुरेसा अनुभव नसताना देखील त्यांना पुण्यातील जम्बो कोविड सेंटर चालविण्यास देण्यात आले. त्यामुळे लाईफ लाईन हॉस्पिटलचे सुजित पाटकर आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार संजय राऊत यांच्यावर कोविड सेंटरमधील झालेल्या रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार घरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा आशयाची किरीट सोमय्या यांच्याकडून शिवाजी नगर पोलिसात तक्रार दाखल करून केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT