Brave Mother Fights Leopard To Save Child In Maharashtra saam tv
मुंबई/पुणे

मुलासाठी बिबट्याला भिडली 'वाघीण'; बिबट्याच्या जबड्यातून लेकराला वाचवलं

Woman Attack On Leopard: राज्यात बिबट्याची दहशत असतानाच एक आई आपल्या लेकरासाठी थेट बिबट्याला भिडलीय. बिबट्याच्या हल्ल्यात नेमकं काय घडलं? आई बिबट्याला का भिडली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • अश्विनी गव्हाणे यांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी बिबट्यावर हल्ला केला.

  • चिमुकला सुखरूप बचावला आहे.

  • १५ दिवसांत बिबट्याचा हा तिसरा हल्ला

मुलासाठी रायगडाच्या कड्यावरून उतरणाऱ्या हिरकणीची कथा तुम्ही ऐकली असेल. मात्र मुलासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून बिबट्याला भिडणारी वाघिणीसारखी ही आई पाहा.खेड तालुक्यातील निमगाव रेटवडी परिसरात मुलाचा घास घेण्यासाठी आलेल्या बिबट्यालाच अश्विनी गव्हाणे वाघिणीसारख्या भिडल्या.आणि आपल्या चिमुकल्या लेकराला वाचवलं.

अवघ्या पंधरा दिवसात निमगाव रेटवडी परिसरात तिसऱ्यांदा चिमुकल्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जरी चिमुकला सुखरुप बचावलाय.अश्विनी गव्हाणेंच्या धाडसाचं डॉक्टरांनीही कौतुक केलयं. दुसरीकडे बिबट्याच्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.

जुन्नर, सोलापूर, कोल्हापूरमध्ये बिबट्यांनी हैदौस घातलेले असतानाच आता खेडमधील बिबट्यांचा हा हल्ला चिंता वाढवणारा आहे. आईच्या धाडसामुळे जरी चिमुकल्याचा जीव वाचला असला तरी बिबट्यांचा संपूर्ण बंदोबस्त कधी होणार असा संतप्त सवाल नागरिकांनी केलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: राज्य सरकारचा निर्णय मोठा, शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला एक वर्ष स्थगिती

गेमझोनच्या नावाखाली चालायचे भलतेच प्रकार; प्रायव्हेट रुममधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा कौल कोणाला? भाऊ, भाई की दादाला?

महिंद्राची जबरदस्त Formula E -कार बाजारात; रेसिंग ट्रॅकवर धुरळा उडवणार

Maharashtra Live News Update: अकोला स्थानिक स्वराज निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळालं चिन्ह

SCROLL FOR NEXT