Police investigate near Mundhwa Bridge after a 23-year-old IT professional died by suicide in Pune. saam tv
मुंबई/पुणे

Pune: बॉयफ्रेंडने केला मानसिक छळ 23 वर्षीय गर्लफ्रेंडची नदीत उडी मारून आत्महत्या; IT क्षेत्रात खळबळ

23 Year Old IT Girl Suicide Case In Pune Kharadi: पुण्यातील खराडी परिसरात 23 वर्षीय आयटी तरुणीने मानसिक छळाला कंटाळून नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

सचिन जाधव, साम टीव्ही

पुण्यातील खराडी परिसरात राहणाऱ्या आयटी क्षेत्रात 23 वर्षीय तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या वादानंतर झालेल्या मानसिक छळामुळे तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निकिता (वय 23) ही काही काळापासून खराडी परिसरातील सिद्धिविनायक पीजीमध्ये वास्तव्यास होती. 6 मे रोजी दुपारी तिने मुंढवा पुलावरून मुळा-मुठा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली होती. सुरुवातील या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती.

दरम्यान तपासादरम्यान चैतन्य संजय कानडे (वय 23, रा. वडगाव शेरी) हा निकिताचा नातेवाईक असून दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. काही काळानंतर चैतन्यने निकिताचा मानसिक छळ सुरू केल्याचा आरोप तिच्या भावाने तक्रारीत केला आहे. सततच्या त्रासाला कंटाळून निकिताने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी निकिताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून खराडी पोलिसांनी चैतन्य कानडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे आयटी क्षेत्रात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहे.

कोयता गँगची दहशत

दरम्यान पुण्यातील आंबेगाव पठार परिसरातील सर्व्हे नं. १६ येथे रात्री सुमारे १:३० वाजण्याच्या सुमारास तीन कोयताधारी युवकांनी परिसरात दहशत निर्माण केली. प्रथम त्यांनी एका रिक्षावर कोयत्याने वार करत नुकसान केले, त्यानंतर एका ECCO वाहनाच्या काचा फोडून तोडफोड केली. या संपूर्ण घटनेचा CCTV व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना फूड पॉइझनिंग; जेवणानंतर मुलांना होऊ लागल्या उलट्या

शिक्षणमंत्र्याचा राजीनाम्यानंतर मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; लोकसभेत सादर मांडणार नवं विधेयक

पंढरपूर मंदिर कॉरिडॉरचं काम कधी सुरू होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी अपडेट

मराठी माणसानं पुन्हा दिल्ली जिंकली, अभिजीत भिडला, दिल्लीश्वर झुकले, मराठी मोडेन पण वाकणार नाही

प्रधानांचा राजीनामा, महाराष्ट्रात भूकंप?फडणवीस, शिंदेंना दिल्लीत बोलावणं, फडणवीस शिक्षणमंत्री होणार, राऊतांचा दावा

SCROLL FOR NEXT