Pune Police Attacked By Group Of Bikers X
मुंबई/पुणे

Pune Police : पुण्यात पोलीसच असुरक्षित! बाईक अडवल्याने तरुणांची गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण

Pune Police Attacked : पुण्यातील खडकी भागात पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेचे कर्मचारी गस्त घातल होते. या कर्मचाऱ्यांवर चौघांच्या टोळक्याने हल्ला केला. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

Yash Shirke

  • पुण्यात रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांना मारहाण

  • भरधाव वेगाने दुचाकी चालवत असल्याने पोलिसांनी केली होती विचारणा

  • रागाच्या भरात तरुणांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर केला हल्ला

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचे उघडकीस आले आहे. गाडी वेगाने का चालवतो असा प्रश्न विचारल्याने टोळक्याने पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. हा प्रकार पुणे-मुंबई महामार्गावर घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (३१ जुलै) रात्री नऊच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर खडकी भागात गुन्हे शाखेचे दोन पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. तेव्हा चार जणांच्या टोळक्याने या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. हल्ला करुन चौघे पळून गेले. पुणे दलातील कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

एक दुचाकीस्वार त्याची दुचाकी वेगाने आणि वेडीवाकडी चालवत असल्याचे पोलिसांनी दिसले. त्याबाबत त्यांनी दुचाकीस्वाराची विचारणा केली. दुचाकीवरील तरुणांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. नंतर दुसऱ्या दुचाकीवरुन आलेल्या त्यांच्या मित्र देखील पोलिसांशी वाद घालू लागले. रागाच्या भरात चौघांनी पोलिसांवर अचानक हल्ला केला.

गस्तीवर असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पुण्यातील खडकी भागात मारहाण झाली. मारहाण करणाऱ्या तरुणांच्या विरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनेद इक्बाल शेख (वय २७ वर्षे), नफीज नौशाद शेख (वय २५ वर्षे), युनूस युसुफ शेख (वय २५ वर्षे), आरिफ अक्रम शेख (वय २५ वर्षे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auspicious Yog Today: आज कार्तिक शुक्ल सप्तमी; बुध ग्रहाची कृपा आणि चंद्राचा मकर प्रवेश ठरणार शुभ

Beach Travel: गर्दीपासून सुटका हवीये? पर्यटकांना भुरळ घालणारे ८ सर्वाधिक स्वच्छ समुद्रकिनारे, एकदा भेट द्याच

Maharashtra Tourism : पांढराशुभ्र धबधबा अन् हिरवेगार वातावरण, महाराष्ट्रातील 'हे' ठिकाण पर्यटकांना लावते वेड

प्रणित मोरे-मालती चाहरच्या केमिस्ट्रीची चर्चा; 'Bigg Boss 19'च्या घरात नवीन लव्ह स्टोरी सुरू, पाहा VIDEO

Laxman Hake : "रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा"लक्ष्मण हाकेंची मागणी | VIDEO

SCROLL FOR NEXT