Pune Crime News Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यातील संतापजनक प्रकार! कामगाराकडून आश्रमातील ३ गतीमंद तरुणींवर लैंगिक अत्याचार

याबाबतची माहिती मिळताच आरोपीला यवत पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत.

Dnyaneshwar Choutmal

Pune Crime News: पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील केडगाव परिसरातील आश्रम शाळेत ३ गतीमंद तरुणींवर मजूर कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील केडगाव परिसरात प्रसिद्ध असलेल्या पंडिता रमाबाई महिला आश्रमातील ३ गतीमंद तरुणींवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आश्रम शाळेतील मजूर कामगारानेच हा लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.मोजस जोरे असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

मोजेस हा आश्रम शाळेतील वॉल कंपाऊंड बांधणारा कामगार म्हणून गेल्या तीन महिन्यापासून त्या ठिकाणी काम करत होता. आरोपीने महिला आश्रमातील तीन गतीमंद मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच आरोपीला यवत पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, साताऱ्यामधूनही महिला अत्याचाराची संतापजनक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. कोळसा कारखान्यात एका आदिवासी महिलेवर ५ नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आहे.

१५ दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्याचे पीडित महिलेने आपल्या जबाबात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT