Pune Kalyani Nagar Porsche Accident  Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune : कल्याणीनगर अपघातप्रकरणी मोठी अपडेट, अल्पवयीन मुलाच्या मित्राचेही ब्लड रिपोर्ट बदलले, कापूसही वेगळा वापरला!

Pune, Kalyani Nagar accident Update : कल्याणीनगर अपघातप्रकरणात आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन मुलाचेच नाही तर त्याच्या मित्राचेही ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

Kalyani Nagar accident, पुणे : पुण्यातील कल्याणीनगर अपघातप्रकरणात (Pune accident) आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन मुलाचेच नाही तर त्याच्या मित्राचेही ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर अल्कहोलिक नसलेल्या दुसऱ्या कापसाचा वापर करण्यात आला. सीएमओच्या रेस्टरुमध्ये रक्ताची अदलाबदल झाल्याचं समोर आले आहे.

कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात (Pune Kalyani Nagar Porsche accident update) वैद्यकीय चाचणीच्या दरम्यान ससून रुग्णालयात (sassoon hospital) अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. मात्र त्यावेळी त्याच्या इतर दोन मित्रांचे देखील रक्ताचे नमुने बदलल्याचे आता पुढे आले आहे. एवढेच नाही तर त्यासाठी अल्कहोल नसलेल्या कापसाचा वापर करण्यात आला असून, थेट सीएमओ (मुख्य वैद्यकीय अधिकारी) अधिकार्‍याच्या रेस्ट रुममध्ये हे रक्त नमुने बदलण्यात आले आहेत. दोषारोपपत्रात हे नमूद करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पुणे पोलिसांनी नुकतेच याबाबत 900 पानांचे दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल केले आहे.

ससून रुग्णालयात फेरफार -

19 मे रोजी कल्याणीनगर येथे मध्यरात्री अपघात झाला होता. त्यानंतर सकाळी साडे अकरा वाजता येरवडा पोलिसांनी सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि त्याच्यासोबत कारमध्ये असलेले दोन मित्र अशा तिघांना ताब्यात घेत अमली पदार्थाचे सेवन केले आहे काय ? हे पाहण्यासाठी वैद्यकीय चाचणी ससून रुग्णालयात केली. त्यावेळी प्रथमोपचार विभागाचा प्रमुख डॉ. श्रीहरी हाळनोर हा कर्तव्यावर होते. त्याच्यासमोरच या तिघा मुलांना हजर करण्यात आले होते. हाळनोर याने तिघा मुलांना काय त्रास होतोय का, असे विचारून वैद्यकीय केसपेपर तयार केले. दरम्यान, न्यायवैद्यकशास्त्र विभागाचा प्रमुख असेला डॉ. अजय तावरे याने अगोदरच डॉ. हाळनोर याला सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार हाळनोर याने सीएमओ रुमच्या बाजूला डॉक्टरांसाठी असलेल्या रेस्टरुममध्ये कारचालक अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने घेतले. यानंतर आणखी तिघा व्यक्तींच्या रक्ताचे नमुने त्याच खोलीत घेण्यात आले. त्यामध्ये अल्पवयीन कार चालक मुलासाठी एका महिलेचे, तर त्याच्या दोन मित्रांसाठी इतर दोन व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. यानंतर मुलाचे आणि त्याच्या मित्रांचे रक्त नमुने डॉ. हाळनोर याने कचर्‍याच्या पेटीत टाकून दिले. त्याऐवजी महिला आणि इतर दोन व्यक्तीचे रक्त नमुने सिलबंद करण्यासाठी पाठवून दिले.

रक्ताचे नमुने घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांना बोलावले -

डॉ. हाळनोर याने रक्ताचे नमुने घेण्यासाठी ससून रुग्णलयात त्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांना बोलावले होते. महिला डॉक्टर तिकडे रक्त नमुना घेण्यासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य घेऊन गेल्यानंतर, डॉ. हाळनोर त्यांना सीएमओसाठी असलेल्या रेस्ट रुममध्ये घेऊन गेला. त्यावेळी तेथे एक अल्पवयीन मुलगा आणि एका महिला अशा दोघांचे रक्त नमुने घेण्यात आले. त्याचवेळी हाळनोर याने आणखी एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेला बोलावून घेऊन तिघांचे रक्त नमुने घ्यायचे असून, साहित्य घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार महिला डॉक्टर साहित्य घेऊन आल्या आणि सीएमओ खोलीत बसल्या. मात्र त्यावेळी हाळनोर याने परत महिला डॉक्टरांना अल्कहोल असलेल्या कापसाऐवजी सुका कापूस घेऊन येण्यास सांगितले. या महिला डॉक्टरांनी तिघांच्या रक्ताचे नमुने घेऊन हाळनोर याच्या ताब्यात दिले.

रक्त नमुने घेताना पोलीस हजर ?

डॉ. हाळनोर याने सीएमओ केबीनच्या बाजूला डॉक्टरांसाठी असलेल्या रेस्ट रुममध्ये सर्वांच्या रक्ताचे नमुने घेतले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तेथे अल्पवयीन मुलासोबतच इतर व्यक्ती देखील उपस्थित होत्या. अल्पवयीन मुलगा आणि त्याचे दोन मित्र अशा तिघांसाठी एक महिला आणि इतर दोघे असे तिघांचे रक्त नमुने घेण्यात आले. महिला डॉक्टर सुका कापूस घेऊन सीएमओ केबीनमध्ये आल्या. त्यावेळी एक महिला, एक मुलगा, एक पोलिस आणि एक व्यक्ती दरवाजाजवळ थांबलेला होता. हाळनोर याने तेथेच महिला आणि मुलाला रक्तगटाबाबत विचारणा केली. त्यामुळे पोलिस समोर असताना देखील रक्त बदलण्यासाठी आलेली मंडळी राजरोस सीएमओच्या केबीनमध्ये फिरत होती. एवढेच नाही तर सीएमओ डॉक्टरच्या रेस्टरुमध्ये शिरुन रक्त देऊन बाहेर येत होती. त्यामुळे कारचालक अल्पवयीन मुलाच्या आई-वडील इतर नातेवाईक, मित्र सहकारी यांनी डॉ. तावरे मार्फत नियोजन लावून डॉ. हाळनोर याच्याकडून रक्त नमुने बदलून घेण्याचे काम केल्याचे दिसून येते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chalisgaon News : निकालापूर्वी चाळीसगावात झळकले विजयाचे बॅनर; आमदार चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT