Pune Accident Mayur Mohite Nephew 
मुंबई/पुणे

Pune Accident Video: कळंब अपघात प्रकरण; मयूर मोहिते यांचा जामीन अर्ज फेटाळला

Pune Accident Mayur Mohite Nephew: दोन दिवसांपूर्वी आंबेगाव येथील कळंब येथे एका भरधाव कारने एक दुचाकीस्वाराला चिरडलं होतं. या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता तर एकजण गंभीर जखमी झाला. राष्ट्रवादी आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे मयूर मोहिते ही कार चालवत होते.

Bharat Jadhav

रोहिदास गडगे , साम प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील अपघात प्रकरणातील आरोपी मयूर मोहितेंना न्यायालयाने दणका दिलाय. मयूर मोहिते दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालायने फेटाळलाय. मयूर मोहिते हे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे आहेत. मयूर मोहिते यांच्या वकिलाकडून खेड उपजिल्हा न्यायालयात जामीन सादर करण्यात आला होता. मात्र न्यायालयाकडून हा अर्ज फेटाळण्यात आलाय. खेड उपजिल्हा न्यायालयात पुन्हा २६ तारखेला याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

दोन दिवसापूर्वी कळंब येथे मयूरने आपल्या कारने एकाला चिरडलं होतं. आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे मयूर मोहिते सुसाट कार चालवत दुचाकीस्वाला चिरडलं होतं. या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता तर एकजण गंभीर जखमी झाला होता. अपघातावेळी कारचालकाने मद्यपान केलं होतं,असं म्हटलं जात आहे. दरम्यान घडलेल्या घटनेवर दु:ख व्यक्त करत आमदार मोहिते यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली होती. अपघातानंतर माझा पुतण्या मयुर साहेबराव मोहिते हा कुठंही पळून गेला नाही. ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा त्याने मद्यपान केलेलं नव्हतं, असं मोहिते यांनी स्पष्ट केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT