Bodies of Two Kids Recovered in Pune Junner Saam
मुंबई/पुणे

पुण्यात खळबळ! चिमुकल्या बहीण - भावाचा मृतदेह शेततळ्यात सापडला, बिबट्याचा हल्ला की आणखी काही?

Bodies of Two Kids Recovered in Pune Junner: जुन्नर शहरातून बेपत्ता झालेल्या दोन चिमुकल्या बहिण-भावाचा मृतदेह शेततळ्यात आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

  • पुण्यातील जुन्नरमधून धक्कादायक बातमी समोर

  • २ चिमुकल्या बहीण भावाचा मृतदेह आढळला

  • दोघांचे मृतदेह शेततळ्यात आढळला

रोहिदास गाडगे, साम टिव्ही

पुण्यातील जुन्नर येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी जुन्नर शहरातून दोन चिमुकले बहीण -भाऊ बेपत्ता झाले होते. दरम्यान, दोन्ही चिमुकल्या बहीण - भावाचा मृतदेह शेततळ्यात आढळून आला आहे. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सध्या सुरू आहे.

सध्या राज्यात बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. बऱ्याच भागात बिबट्यांचा खुला वावर पाहायला मिळत आहे. बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्यानं आतापर्यंत अनेकांना गंभीर जखमी केलं आहे. अशातच जुन्नर शहरातही दोन चिमुकल्यांवर बिबट्याचा हल्ला झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आफान इनामदार (वय १०) आणि रिफत इनामदार (वय ७) हे दोघे चिमुरडे गुरुवारी दुपारपासून बेपत्ता होते. शोधकार्य सुरू असताना बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र काही वेळापूर्वी या दोन्ही मुलांचे मृतदेह शहराजवळील शेततळ्यात आढळून आले.

दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह शेततळ्यात आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन रूग्णालयात शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले.  मृत्यूचे नेमके कारण काय? हे उलगडण्यासाठी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli News : डोंबिवलीतील अनधिकृत ६५ इमारतीमधील रहिवाशांना मोठा दिलासा; कोर्टात नेमकं काय घडलं?

२ महिन्यांवर लग्न, डॉक्टर तरूणीनं आयुष्य संपवलं; कॅफेच्या नवव्या मजल्यावर गेली अन्...

Maharashtra Live News Update: लोणावळ्यात भाजपच्या प्रचार सभेत चित्रा वाघ यांचे वक्तव्य चर्चेत

Vande Bharat News : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या दोन स्थानकांवर वंदे भारतचा थांबा

Matar Kebab Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बनवा कुरकुरीत, मसालेदार व्हेज मटर कबाब

SCROLL FOR NEXT