Lightning struck the Oxen Saam Tv
मुंबई/पुणे

वीज पडून शेतकऱ्याच्या १२ शेळ्या दगावल्या; जुन्नर तालुक्यातील घटना

पुणे (Pune) जिल्ह्यात अनेक ठिकाणी बुधवारी मुसळधार पाऊस झाला.

रोहिदास गाडगे

जुन्नर : पुणे (Pune) जिल्ह्यात अनेक ठिकाणी बुधवारी मुसळधार पाऊस झाला. जुन्नर (Junnar) तालुक्यातही विजेच्या कडकटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्या, तालुक्यातील आणे गुळुंचवाडी येथील ठाकर वस्तीवरील धोंडिबा कोतवाल यांच्या शेळ्यांच्या कळपावर वीज पडली. यामध्ये तब्बल 12 शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय एक महिलाही गंभीर जखमी झाली. (Pune Junnar Latest Marathi News

माहितीनुसार, धोंडिबा कोतवाल आणि त्यांची पत्नी कमल कोतवाल हे शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. आणे शिवारात ते शेळ्या चारत असताना अचानक मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात झाली, शेळ्यांनी निवाऱ्यासाठी एका करवंदीच्या झाडाचा आसरा घेतला. मात्र, त्या झाडावर अचानक वीज कोसळली, यामध्ये 12 शेळ्या मृत्युमुखी पडल्या. शेळ्यांच्या शेजारीच झाडाखाली बसलेल्या कमल कोतवाल यांना सुद्धा विजेच्या झटका लागला. यामध्ये कमल सुद्धा जखमी झाल्या आहेत.

कोतवाल यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब असून ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे. त्यांच्यावरच असे नैसर्गिक संकट ओढवल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त गरीब कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष आग्रे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ZP School : जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला; १३ विद्यार्थी गंभीर, राज्यात खळबळ

Jonty Rhodes: वनडेच्या भवितव्यावर जॉन्टी र्‍होड्सचं मोठं वक्तव्य; जॉन अब्राहमसोबत रॉटरडॅम डॉकर्सच्या जर्सीचं अनावरण

Ghatkopar Landslide: साखरझोपेत असताना काळाचा घाला, मुंबईमध्ये दरड कोसळून एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Mumbai Art Exhibition : चित्रांचा कलाविष्कार! प्रसिद्ध चित्रकाराचे मुंबईत प्रदर्शन, अप्रतिम 'जलरंग कलाकृती' पाहायला कुठे अन् कधी जाल?

High BP: तरुणांमध्ये वाढतोय हाय BP आणि मधुमेह? ‘ही’ लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT