ज्ञानवापी मशीद वाद; पुण्यात भाजप महिला नेत्यावर गुन्हा दाखल

अब्दुल गफुर अहमद पठाण यांनी याबाबत फिर्याद दिली होती
Nupur Sharma
Nupur SharmaSaam TV
Published On

पुणे : ज्ञानवापी मशिदीचा (Gyanvapi Masjid) मुद्दा सध्या देशभरात गाजत आहे. मशिदीच्या आत शिवलिंग की कारंजे यावरून वाद सुरू आहे. अशातच, ज्ञानवापी मशिदीसंदर्भात चर्चा करत असताना धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पुण्यात (Pune Police) एका भाजप महिला नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील भाजपा (BJP) प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्यावर पुण्यातील कोंडवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Pune Latest Marathi News)

Nupur Sharma
महाराष्ट्र सरकारला एसटी महामंडळाचं खासगीकरण करु देणार नाही; सदावर्तेंचा इशारा

एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा असल्याची तक्रार पुणे पोलिसांत देण्यात आली होती. अब्दुल गफुर अहमद पठाण (वय ४७, रा. अशोका म्युज कोंढवा) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून पुणे पोलिसांनी नुपुर शर्मा या भाजपा महिला प्रवक्त्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशिदीचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. त्यात पाण्याचे कारंजे असलेल्या ठिकाणी शिवलिंग असल्याचा दावा करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून एका वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी मशिदीबाबत चर्चा आयोजित करण्यात आली होती.

या चर्चेत नुपुर शर्मा यांनी आमच्या धार्मिक भावना दुखविल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com