महाराष्ट्र सरकारला एसटी महामंडळाचं खासगीकरण करु देणार नाही; सदावर्तेंचा इशारा

एसटी बसच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरुन गुणरत्न सदावर्तेंनी राज्य सरकारवर टीका केलीय.
Gunratna Sadavarte
Gunratna SadavarteSaam Tv
Published On

मुंबई : पहिली इलेक्ट्रिक बस 'शिवाई'चा (Shivai electric bus) लोकार्पण सोहळा आज अहमदनगर आणि पुणे येथे पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. तर दुसरीकडे एसटी कष्टकरी जनता संघातर्फे गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी दादर येथे एसटीची पूजा करुन केक कापला. यावेळी सदावर्ते यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. कष्टकरी जनसंघाकडे 50 हजारांपेशा जास्त सभासद झाले आहेत, त्यामुळे महाराष्ट्र सरकारला (Mva Government) खासगीकरण करु देणार नाही, असा इशारा सदावर्ते यांनी राज्य सरकारला दिला. ज्या प्रमाणे सरकारने एसी बसेस राजकीय व्यक्तींना चालवायला दिले, तसे इलेक्ट्रिक बसबाबत घडू देणार नाही, असंही सदावर्तेंनी म्हटलं.

Gunratna Sadavarte
मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ

राज्यात एसटी महामंडळाच्या खासगीकरणाचा मुद्दा राजकीय पटलावर चांगलाच गाजला. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन सरकारविरोधात तीव्र आंदोलनही छेडले. त्यानंतर गेले काही महिने गुणरत्न सदावर्ते विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटला. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनातून माघार घेतल्यानंतर पुन्हा एकदा लालपरी रस्त्यावर धावू लागली आहे.

दरम्यान, आज 1 जून 1948 ला पहिली एसटी बस ही नगर ते पुणे धावली आणि आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शिवाई ही पहिली विद्युत प्रणालीवरील बसचा लोकार्पण सोहळा अहमदनगर आणि पुणे येथे पार पडला.शिवाई या पहिली विद्युत प्रणालीवरील बस आज नगर ते पुणे धावली. या बसला हिरवा झेंडा 1 जून 1948 प्रथम बस वाहक लक्ष्मणराव केवटे यांच्या हस्ते दाखवण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले उपस्थित होते.

Gunratna Sadavarte
आग लावण्याचा प्रयत्न केलात तर...; दीपाली सय्यद यांचा फडणवीसांना इशारा

शिवाई ही पहिली विद्युतप्रणाली बस नगर ते पुणे तारकपुर या बस स्थानकातून सोडण्यात आली. पहिली बस ही पोलीस प्रोटेक्शन मध्ये नगर ते पुणे धावली. पहिल्या बसला तिकीट फक्त 2 रुपये 50 पैसे होते.पहिली बस आणि आजची शिवाई बस यामध्ये जमीन आसमानचा फरक झाल्याचे पहिल्या एसटी बसचे वाहक लक्ष्मणराव केवटे यांनी सांगितलं.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com