झुबेर हंगरगेकर हा १५ वर्षांचा अनुभव असलेला सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे
एटीएसने त्याला AQIS-समर्थनाच्या संशयावरून अटक केली आहे.
झुबेरने हिंजवडी आणि कल्याणीनगरमधील आयटी कंपन्यांमध्ये नोकरी केल्याची माहिती तपासात स्पष्ट
झुबेर हंगरगेकरबाबत नव्याने धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र एटीएसने अटक केलेल्या संशयित दहशतवादी सॉफ्टवेअर इंजिनीअर जुबेर हंगरगेकरची 'कुंडली' साम टीव्हीच्या हाती लागली आहे. या संशयित दहशतवादी झुबेरने पुण्याीतील हिंजवडीआणि कल्याणीनगर परिसरातील नामांकित आयटी कंपन्यांमध्ये काम केल्याची माहिती समोर आली आहे. या हंगरगेकरला अटक केल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार-प्रचार करणे हा मुख्य उद्दिष्ट असलेल्या झुबेर हंगरगेकर याला महाराष्ट्र एटीएसने अटक केली. त्याच्याबद्दल आता नवनवीन खुलासे होत असतानाच, संशयित दहशतवादी झुबेर हंगरगेकरची "कुंडली" 'साम टीव्ही'च्या हाती लागली आहे.
झुबेर हंगरगेकर गेल्या १५ वर्षांपासून सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. सोलापूर सोशल असोसिएशन उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षण घेत त्याने सोलापूरच्या वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बी.ई पदवी घेतली. धक्कादायक म्हणजे त्याने पुण्यातील हिंजवडी आणि कल्याणीनगर येथील नामांकित आयटी कंपनीमध्ये नोकरी केली.
२०१५ मध्ये दहशतवादाशी संबंधित ज्ञात व्यक्तींशी त्याचा संपर्क होता. अतिरेकी धर्मोपदेशकांकडून मिळणारे कट्टरपंथी साहित्य वाचण्यास त्याने सुरुवात केली. आयईडी बनवणे, एकटे हल्ले करणे आणि गनिमी शैलीतील कारवाया करणे यावरील प्रशिक्षण पुस्तकांचा हंगरगेकर याचा दांडगा अभ्यास आहे. गनिमी युद्ध, विविध प्रकारचे आयईडी तयार करणे आणि अशा उपकरणांमध्ये सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या स्फोटके तयार करणे शिकवणाऱ्या नियमावलींमध्ये हंगरगेकर पारंगत आहे.
आंतरराष्ट्रीय टेलिग्राम गटांसह अनेक टेलिग्राम गटांचा तो सदस्य आहे, हे तेच गट आहेत जे अतिरेकी सामग्री प्रसारित करतात. अनेक तरुणांना त्याने "जिहाद करण्याचे मार्ग" यावर व्याख्यानं दिले आहेत. जिहाद हाच भारतात खिलाफत आणण्याचा आणि शरियत शासन स्थापित करण्याचा एकमेव मार्ग आहे, या कल्पनेचा त्याने ठिकठिकाणी जाऊन प्रसार केला. अतिशय आश्चर्यकारक बाब म्हणजे झुबेर हंगरगेकरने कुटुंबात शरिया पद्धती लागू केल्या. त्याने प्रभावी तरुणांना सक्रियपणे लोकशाही शरियतच्या विरोधात असल्याचा उपदेश त्याने केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.